(1979) मी आठवीची परीक्षा दिली होती. गणित हा माझा सर्वात आवडता विषय होता. त्यातल्या त्यात भूमितीपेक्षा बीजगणित. मी गणितातले प्रश्न फटाफट सोडवायचो. कुठलाही क्लास लावला नव्हता. क्लासची फी परवडत नव्हती. आमच्या मजल्यावर विश्वेकर राहायचे. ते मराठी शिकवायचे. ताई म्हणाली होती की पुंडाला मराठी क्लास लावूया. पण मी नको म्हणायचो. त्यांचं मराठी मला जमत नव्हतं. शाळेत जे शिकवायचे ते मी लक्ष देऊन ऐकायचो, घरी येऊन पाठ करायचो. मी चांगली तयारी करून आठवीची परीक्षा दिली. एप्रिल मध्ये निकाल लागला. आठवीत मी वर्गात सातवा आलो होतो. तसं घरी कोणाला माझ्या अभ्यासाची चिंता नव्हती. मे महिना सुट्टीचा होता. बरेचसे मित्र गावाला गेले होते. माझ्याबरोबर खेळायला कोणी नव्हतं. एका दिवशी बाजूच्या जया बेन यांनी विचारलं, "पुंडा हमारे साथ पिकनिक चलोगे क्या?" मी म्हटलं, "कोण कोण येतंय? मला घरी विचारावं लागेल." ते बोलले विचार. आमच्या घरचे आणि मुन्नाच्या घरचे सर्वजणं जाणार आहोत. मी घरी आईला आणि अण्णांना विचारलं, 'मी जाऊ का जयाबेन बरोबर पिकनिकला?' अण्णाने परवानगी दिली बाजूच्या दोघांनीही सर्व तयारी केली होती. कसं जायचं, किती वाजता निघायचं सर्व ठरलं. माझा मित्र मुन्ना, रुपेश आणि हीना पण येणार होते. पहिल्यांदा मी एकटा पिकनिकला जाणार होतो. माझ्या बरोबर घरातले कोणीच नव्हते. पिकनिकचं ठरल्यावर दोन दिवस आम्ही सर्व त्यावरच चर्चा करत होतो. तिकडे मोठा डोंगर आहे माकडं आहेत. मोठं मोठी झाडं आहेत वगैरे. मी झोपेत पण तेच विचार करत होतो. आईने आधीच सांगितलं होतं, तू एकटा जातो आहेस, तिकडे मस्ती करायची नाही, झाडावर चढायचं नाही. मी सर्व मान्य केलं. मला कधी एकदा पिकनिकला निघतो असं झालं होतं. सोमवारचा दिवस होता. पहाटे सातच्या ट्रेन ने कल्याणला जायचं होतं. जयाबेन आणि मुन्नाची ताई हीनाने सर्व तयारी केली होती. ढोकळा, पुरी, भाजी, मोरब्बा, खाखरा, भेळसाठी पुरी फरसाण, खारे शेंगदाणे, खारे चणे, असे भरपूर पदार्थ घेतले होते. मला आई आणि वहिनीने आठ इडल्या शाळेच्या डब्यात घालून दिल्या होत्या. चटणी खराब होणार म्हणून थोडंसं लोणचं दिलं होतं. मी माझा डबा जयाबेनकडे दिला. माझ्याकडे काहीच नव्हतं. सर्व पैसे मुन्नाची आई जयाबेनच करणार होती. तसं आमची तिन्ही घरं एका परिवारासारखीचं होती
ठरल्याप्रमाणे आम्ही सर्वजण सातच्या सुमारास घर सोडलं. चालत डोंबिवली स्टेशनला पोचलो. सोमवार असल्यामुळे स्टेशनला कामावर जाणाऱ्यांची गर्दी होती. रमेशभाई आणि हर्षदभाईंनी आमच्या सर्वांचं तिकीट काढलं. नऊ फुल आणि दोन हाफ. रूपा आणि प्रकाश लहान होते. सर्वजण ब्रिज चढून एक नंबर प्लॅटफॉर्मवर पोचलो. मी पहिल्यांदा कल्याणच्या दिशेने जाणार होतो. थोड्या वेळात कल्याण लोकल आली. आम्ही सर्व ट्रेन पकडून आत जाऊन बसलो. एरवी मी नेहमी शाळेत जाताना ट्रेनमधे दारावर उभा राहायचो. कल्याण लोकल असल्यामुळे रिकामी होती. ठाकुर्ली नंतर कल्याण स्टेशन आलं. कल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूला खूप घाण होती. आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर उतरलो. स्टेशनच्या बाहेरुन दोन टांगा केल्या. तेव्हा कल्याण पश्चिमेला रस्त्याचं काम सुरू होतं. मुन्नाच्या नातेवाईकांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला आंब्याचं सरबत दिलं. सरबत पिऊन त्याच्या घरचे दोघे आणि आम्ही अकरा असे तेरा जण. तीन टांगा केल्या आणि 'हाजी मलंग'साठी निघालो.
कल्याण शहर सोडून थोडं पुढे गेलो. रस्स्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ होती. काही जण शेतीपण करीत होते. समोर मोठे डोंगर दिसायला लागले. डोंगर आभाळाला टेकले होते. मोठमोठी झाडं दिसायला लागली. दुपारचे अकरा वाजले असतील, डोक्यावर रणरणीत ऊन होतं. गरम हवा चेहऱ्याला स्पर्श करत होती. एवढं ऊन असून घाम मात्र येत नव्हता. रस्त्यावरून टांगा जातानाचा तो आवाज मस्त वाटत होता. थोड्याच वेळात आम्ही 'हाजी मलंग'च्या पायथ्याशी पोचलो. रमेशभाईंनी दोन्ही टांग्यांचे पैसे चुकते केले.
आम्ही जिथे उतरलो तिथे समोर काही दुकानं आणि हॉटेलं होती. जाणारे येणारे लोक तिकडे विश्रांती घेत होते. तिकडे खायला प्यायलाही मिळत होतं. आम्ही सर्वांनी एका दुकानातून थंड सरबत घेतलं. जयाबेनने हर्षदभाईंना दोन डझन केळी घ्यायला सांगितली. आम्ही सर्वांनी डोंगर चढायला सुरुवात केली. भरपूर पायऱ्या होत्या. आजूबाजूला झाडी असल्यामुळे थंड वातावरण होतं. थोडं पुढे पायऱ्या चढल्यावर काही माकडं झाडावरून खाली उतरताना दिसली. तेव्हा मला समजलं जयाबेनने केळी का घेतली ते. आम्ही त्या माकडांना केळी दिली. काही माकडं हातातून केळी घेऊन गेली. आमच्या सारखे अजून बरेचसे लोक होते. माकडं केळी खाताना मजा येत होती. पायऱ्या चढत थोडं पुढे गेलो, वाटेवर एक छोटंसं मंदिर लागलं. तिकडे पाया पडून परत पायऱ्या चढायला सुरुवात केली. खूप पायऱ्या होत्या, मी सरळ चढत होतो. बाकीच्यांना दम लागायला लागला. थोडी विश्रांती घेऊन पुढे निघालो. आजूबाजूचं दृश्य बघण्यासारखं होतं. थोड्या वेळात 'हाजी मलंग दर्गा' आला. आमच्यासारखे बरेच लोक होते. दर्ग्यामध्ये संपूर्ण शांतता होती. हिरव्या मखमली कापडाची आणि फुलांची सुंदर सजावट होती. तिकडे थोडावेळ थांबलो आणि सर्वजण पुढे निघालो. थोड्याच अंतरावर हिरव्यागार गवताने भरलेलं एक छोटंसं मैदान होतं. छोटी मोठी झाडं होती. सर्वांनी आपलं आणलेलं सामान खाली ठेवलं आणि थोडी विश्रांती घेतली. सर्वांना भूक लागली होती. हीना आणि दोन्ही जयाबेन भेळ बनवण्याच्या तयारीला लागल्या. सर्वजण जेवायला बसलो. भरपूर जेवण आणल्यामुळे सर्वजणांना व्यवस्थित जेवण मिळालं. जेवण झाल्यावर खेळ खेळायला सुरुवात केली. गाण्यांच्या भेंड्यांपासून सुरुवात झाली. मग डोळ्यांना पट्टी बांधून पकडा पकडी, लंगडी, वगैरे. तसे खेळ आम्ही शिवप्रसादमधेही खेळायचो पण इकडची मजा वेगळीच होती. त्या मैदानातून समोर आजूबाजूचं दृश्य खूप छान दिसत होतं. चारही बाजूने डोंगराला आभाळ टेकल्यासारखं दिसत होतं. डोंगरावर फळा-फुलांची झाडं होती. मे महिना असल्याने फुलांच्या झाडांना रंगीबेरंगी फुलं आली होती. पक्ष्यांचा मधुर आवाज येत होता. आमचे खेळ संपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजायला आले होते. रमेशभाई म्हणाले, 'आता आपल्याला निघायला हवं.. डोंबिवलीला आपण सहा-साडेसहापर्यंत पोचू'. काही वेळातच आम्ही उरलेलं सामान घेऊन निघालो. सर्वजण दमलेले होते. येतांना जो उत्साह चेहऱ्यावर होता तो नाहीसा झाला होता. खाली उतरताना परत ती माकडं दिसली. उरलेल्या वस्तू माकडांना दिल्या. अर्ध्या तासात आम्ही सर्व हाजी मलंगच्या पायथ्याशी आलो. तिकडच्या एका दुकानातून पक्ष्यांच्या चार-पाच रंगीबेरंगी टोप्या घेतल्या. त्याचबरोबर पिवळा, हिरवा, लाल रंग लावलेल्या दोन काठ्यासुद्धा घेतल्या. ती 'मलंग गड'ची निशाणी होती. ती काठी हातात आहे म्हटल्यावर ते 'मलंग गड'ला जाऊन आलेत, असं लोकं ओळखायचे!! परत टांगा करून कल्याणला आलो. तिकडून ट्रेनने डोंबिवली स्टेशनला उतरलो आणि चालत-चालत 'शिवप्रसाद बिल्डिंग' गाठली. पुढच्या आठवडाभर फक्त आणि फक्त "हाजी मलंगगड" हाच विषय होता.

छान माहिती दिली. नि स
ReplyDeleteछान माहिती मलंगडाचे भोवताली असलेला निसर्ग सहल चांगल्या प्रकारे enjoy केली
धन्यवाद.
Deleteस्वतः सोबत तुम्ही इतर पात्रं पण जिवंत केली...
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदर वर्णन, पिकनिक चे.
ReplyDeleteमलाही ऑडिओ करताना मजा आली
Deleteधन्यवाद.
Deleteमस्त पिकनिक! वाचताना स्वत: गेल्यासारखं वाटलं.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete