माझी आई कपडे धूत होती. माझे कपडे होते. अचानक तिच्या हाताला काहीतरी लागलं आणि रक्त यायला लागलं. चड्डीच्या खिशात ब्लेड होतं. आजूबाजूचे रस्त्यावर जाणारे गोळा झाले. तुमच्या पुंडाला कळत नाही खूप मस्ती करतो त्याला चांगलीच शिक्षा द्या.. वगैरे, आईने जखमेवर हळद लावली, आणि कापड बांधून घेतलं. दुपारी मी घरी आलो तेव्हा कळलं मला, थोडसं रडायला आलं. आईला म्हटलं ताईला सांगू नको. नाहीतर बेदम मारलं असतं. आईला माझ्यावर खूप प्रेम होतं. खूप प्रेमळ होती ती. तिने कधीच मला किंवा कोणालाही मारलं नव्हतं. ती कधी ओरडायची पण नाही. आमच्यासाठी खूप कष्ट केले तिने. मस्तीखोर असल्यामुळे सर्वात जास्त मीच त्रास द्यायचो.
श्री वेंकटरमण देवस्थानाच्या समोर आमच्या काकांचं किराण्याचं दुकान होतं. मी पाचवीनंतर तिकडे जायला लागलो. दुपारी काकांचा मधला मुलगा सूर्या दुकानात असायचा, आम्ही त्याला सूर्याअण्णा म्हणायचो. काका आणि मोठा भाऊ कडक होते. मी हळूच बघायचो.. दुकानात कोण आहे?काका किंवा मोठा भाऊ असतील तर लांबूनच कल्टी मारायचो. सूर्या असेल तर मजा असायची. तो काहीतरी खायला द्यायचा. मस्करी करायचा मस्त वाटायचं. समोरच देऊळ होतं. बाहेर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लोकांना बसायला जागा होती. रोज दुपारी एक माणूस तिकडे झोपायचा. तो हॉटेलात जेवण बनवायचा. त्याच पोट खूप मोठं होतं. तो गाढ झोपला की सारखा घोरायचा. श्वास घेताना पोट वर खाली व्हायचं.आम्हाला मजा यायची. आमचा भाऊ सांगायचा त्याला तू उठवलंस तर तुला एक गुळाचा तुकडा आणि पोटाला हात लावला तर गुळाचे दोन तुकडे!! मला तर गम्मत वाटायची. मी कधीच दुसऱ्याचा विचार केला नाही. एक दिवशी दुपारी मी गेलो त्याच्या पोटाला हात लावायला; मला दोन गुळाचे तुकडे मिळणार होते. तेवढ्यात त्याला जाग आली. तो उठला आणि माझ्या अंगावर धावून आला मी कसला त्याच्या हातात येतोय? मी पळत सरळ काकांच्या दुकानात!! भाऊ बोलला मानला तुला, हे घे. त्यांनी एक गुळाचा तुकडा दिला.
आजीचं घर जवळ होतं. मधे चार मुस्लिम लोकांची घरं होती. चार घरं सोडली की आजीचं घर. आईची आई. आजी खूप हुशार होती. आजोबा कित्येक वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते. आजी खूप कष्टाळू होती. ती स्वतः कमवत होती. कोणावर अवलंबून नव्हती. ती आंबा, चिकू, नारळ, नारळाच्या झाडांच्या पानातून झाडू, देवासाठी लागणारी कापसाची वात सर्व विकून पैसे कमवायची. आजीला तीन मुलं. माझी आई, मावशी जी मिरजला राहते आणि मामा. आजीकडे मामा-मामी त्यांची लहान मुलं राहायची. आमच्यापेक्षा आजीचं घर खूप मोठं होतं. जागा पण मोठी होती. जवळपास वीस नारळाची झाडं, दोन आंब्याची झाडं, एक चिकू आणि एक पेरुचं झाड होत. छोटंसं तळ आणि विहीर होती. मी विहिरीतून झाडांना पाणी घालायचो तळं सुंदर होतं. त्यात अांघोळ करायचो. कागदाची होडी सोडायचो. तळ्याच्या पाण्यावर दगड मारायचो. तीन-चार बेडूक बऱ्याच वेळेस पाण्यावर तरंगत जायचे. बघायला गम्मत वाटायची. एप्रिल-मे मधे भरपूर आंबे यायचे. माझी गँग होतीच कैऱ्या तोडायला. आजी ओरडायची कैऱ्या तोडू नका, मोठी होऊ दे, आंबा पिकला की सर्वाना खायला मिळेल. नारळाची वीस एक झाडं होती. नारळ काढायला आजी नारायणला बोलवायची. एक-दोन पाहिजे असेल तर मी चढायचो. एरवी मी नारळ काढताना दिसलो की माझी तक्रार ताईकडे! एक दिवस दुपारच्या वेळेला मी आजीकडे गेलो. सर्व झोपले होते. त्यातल्या त्यात छोटं नारळाचे झाड निवडलं. वरती पाहिलं बरेचसे नारळ होते. एक तरी नारळ काढायचाच!! विचार केला, हळूच चढायला सुरुवात केली. नारायण हाताला आणि पायाला दोरी घेऊन चढायचा. मी असाच चढायचो. मी कुठलाही झाड सरळ चढायचो. मी लहान होतो, बारीक होतो, वजन कमी होतं, शरीर पण हलकं होत. त्यामुळे इतरांपेक्षा भराभर चढायचो. नारळाच्या झाडाच्या फांदीजवळ पोचलो. बरेचसे नारळ होते. एक नारळ निवडला. तो मला खाली टाकायचा नव्हता. एक हात झाडाला घट्ट पकडून दुसऱ्या हातानी नारळ फिरवायला सुरुवात केली. तेवढ्यात ज्या हाताने झाडाला घट्ट पकडलं होत त्या हाताला मोठी मुंगी चावली, हात सुटला आणि मी झाडावरून खाली पडलो. झाड एवढं उंच नव्हतं तरी पण वीस फूट असेल. जसा मी पडलो तसा बेशुद्ध... जेव्हा थोड्यावेळाने शुद्धीवर आलो तेव्हा मला उठायला जमत नव्हतं. आजूबाजूला पाहिलं कोणीचं नव्हतं. तसाच थोडावेळ पडून राहिलो. नंतर उठलो. मला नीट उभं राहता येत नव्हतं. मला वाटलं आता डॉक्टरकडे जावं लागेल. कुठे जखम झाली नव्हती, मी कसा पडलो मलाच कळल नव्हतं. एवढ्या झाडांवर चढलो होतो, पण काहीच झालं नव्हतं. पहिल्यांदा पडलो. घरची आठवण येत होती. ताईला कळलं तर बेदम मार पडला असता. घरी गेलो तर सर्व झोपले होते. ताई आणि आईच्यामध्ये गुपचूप झोपलो. घरी काहीच सांगितलं नाही. एवढं होऊनसुद्धा मी झाडावर चढायचं सोडलं नाही.
फारच खोडकरपणा केला तसेच आईची माया ताईची भिती छान वर्णन करतात
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप छान लिहिलंय पै काका...
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteMastch kaka asa vatatay ekhada pustak Vachtoy
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसर,
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे. आणि खरंच तुम्ही एवढे खोडकर होतात ह्यावर विश्वास नाही बसत😃
धन्यवाद.
Deleteतुमची पोस्ट वाचुन माझं बालपण आठवलं
ReplyDeleteफक्त झाड वदलल चिंचा व आंब्याचं
मी पडलो नव्हतो एवढच
त्यातल्या त्यात मी एकुलता एक नवसाचा कोंबडा
तुम्ही मोठ्या मनानं हे सर्व कबुल केलं हे उल्लेखनीय
एकंदरित छान सुंदर वातावरण संपूर्ण फैमिली एकत्र
धन्यवाद.
Deleteसर खूप छान...बालपणाच्या रम्य आठवणी...
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteप्रत्येकाच्या लहानपणींच्या खूप आठवणी असतात. सर त्या, इतक्या रंगवून आणि सविस्तर लिहीलयत त्याबद्दल तुमचं कौतुक आहे.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसर लहान पणाच्या आठवणी सांगताय, भीती नाही वाटत,हि गोष्ट आत्ता ताईला कळल्यावर तीची काय बोलेल तिची रियाशन का होती.
ReplyDeleteआता घरातल्या सर्वांना कळलेलं आहे, त्यामुळे भीती नाही.
Deleteअरे व्वा! सुंदर लेख लिहिला आहे .
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteशेट छोटी छोटी वाक्ये चासन जमतात तुम्हाला.
ReplyDeleteवाटल न्हवत तुम्ही लेखक मटेरियल आहात.
धन्यवाद.
Delete