शाळेला आषाढी एकादशीची पहिली सुट्टी होती. त्यानंतर एक-एका सणाला सुरुवात झाली. नागपंचमीला शाळेला सुट्टी नव्हती. मी शाळेला निघालो होतो, इमारतीच्या खालीच एक माणूस साप (नाग) घेऊन आला होता. मी काय थांबलो नाही. स्टेशनजवळ पोचलो, कामत मेडिकल समोर दोघे तिघे टोपलीत साप घेऊन उभे होते. ते पुंगी वाजवत होते पुंगीच्या आवाजाला तो नाग मान डोलवत होता. लोक पैसे देत होते. काही लोकं दूधपण पाजत होते. माझी अकरा दहाची गाडी होती. मी घाईत निघालो स्टेशनला.
रक्षा बंधन म्हणजे "राखी पौर्णिमा"
आमच्या कुंदापूरला हा सण नव्हता. 'रक्षा बंधन' माझ्यासाठी पहिल्यांदाच होत होता. दोन्ही ताईंनी मला राखी बांधली, खायला लाडू दिला. मी काहीच नाही दिलं त्यांना. मी शाळेत जात होतो ना.. माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हाची राखी म्हणजे स्पंजचे गोलाकारचे तुकडे त्यावर रंगीत कागद आणि मणी असायचे. हातापेक्षा राखी मोठी असायची. राखी बांधली की शेजारच्यांना दाखवायला जायचो. रेडिओवर दिवसभर 'रक्षा बंधन'ची गाणी असायची "बेहनाने भाईकी कलाईपर प्यार बांधा है".
कृष्ण जन्माष्टमी
अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता श्रीकृष्णाची पूजा असायची. रात्री अकराच्या सुमारास भटजी यायचे. तुळस आणि फुलं मुबईच्या मार्केटमधून आणलेली असायची. श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून तुळस वहायची. भटजी सहस्त्रनाम म्हणायचे. ठीक बारा वाजता पूजा असायची. चार पाच प्रकारचे लाडू, पोहा आणि लाह्यांचा प्रसाद असायचा. आमच्या बाजूच्या रमेशभाईंकडे रात्रभर पत्ते खेळायला लोकं जमायची. पूजा संपली की आम्ही त्यांना प्रसाद द्यायला जायचो. प्रसाद वाटून झाला की जेवण. पंधरा ते वीस प्रकारच्या भाजी मिक्स करून स्पेशल भाजी असायची. त्याला आम्ही "गजभजी आंबट" म्हणायचो. शेवटी खीर असायची. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंदा. बाजूच्या इमारतीत 'मिलन सोसायटी'त "गोविंदा" दही हंडी होती. गावाला गोविंदा हा प्रकार नव्हता. मी हा प्रकार पहिल्यांदा बघत होतो. मोठी दोरी बांधली होती. तिच्या मध्यभागी एक मडकं बांधलं होती. फुगे बांधले होते. आजूबाजूची मुलं जमली होती. जास्त कोणाची ओळख नव्हती आणि घरून बंधन होतं. अण्णाने बजावलं होतं, 'पुंडाला खाली जाऊ द्यायचं नाही'. स्पीकरवर गोविंदाची गाणी लागली होती. पहिला थराला मोठी माणसं उभी राहिली. दुसऱ्या थरावर मुलं चढली. तिसऱ्या थरावर एक मुलगा चढत असतांना सर्वजण खाली कोसळले. लोकं बादल्याभरून पाणी त्यांच्या अंगावर टाकत होते. हे सगळं बघून मला जाम मजा वाटत होती. एकदा मला सोडलं असतं तर... मी भराभर चढून हंडी फोडली असती. दोन तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर दही हंडी फुटली.
GSB किंग्स सर्कलचा सार्वजनिक गणपती उत्सव.
काकाकडे गणपती असल्यामुळे आमच्याकडे गणपती नव्हता. आमचा GSB सार्वजनिक गणपती मुंबईला किंग्स सर्कलला होता. तिकडे पाच दिवसांचा गणेशोत्सव असायचा. आम्ही मुंबई आलो त्यावर्षी रविवारी किंग्स सर्कल गणपती बाप्पाला जायची संधी मिळाली. रविवारी मावशीचा मुलगा, वेंकटेश मामा यांच्याकडून पूजा होती. अण्णा-ताईला सुट्टी होती. मला पण सुट्टी होती.
अण्णा, ताई, छोटी ताई, आई, भाऊ आणि मी, आम्ही सर्व गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो. माटुंग्याला जायचं होतं. अण्णाने सर्वांची रिटर्न तिकीटं काढली. VTची स्लो ट्रेन पकडली. सर्वजण आत सीटवर जाऊन बसलो. एरवी मी शाळेत जाताना बाहेरच उभा राहायचो. ट्रेन सुरू झाल्याशिवाय चढायचो नाही. आज सर्वांबरोबर गुपचूप आत बसलो होतो. माटुंगा स्टेशनवर उतरलो. जिना चढून खाली आलो. सर्व मद्रासी लोकांची दुकानं होती. उजव्या बाजूला सर्कल होतं. असंख्य प्रमाणात कबुतरं होती. मी एवढी कबुतरं कधीच पाहिली नव्हती. काही लोकं कबुतरांना दाणे खायला घालत होते. मग समजलं की त्याला 'कबुतर खाना' म्हणतात. त्याच रस्त्याने पुढे गेलो.. 'सायन सर्कल' आलं. डाव्याबाजूला वळलो, समोर एक सिनेमाघर होतं. थोड्याच वेळात किडवाई रोडवर पोचलो. समोर SNDT कॉलेजच्या बाजूला एक मोठी कमान होती. त्यावर 'GSB सेवा मंडळ सार्वजनिक गणपती उत्सव' असं लिहीलेलं होतं. समोर गणपती बाप्पाची मोठी मूर्ती दिसली. पुष्कळ गर्दी होती. आम्ही आत गेलो. दहा वाजले होते, नाश्ता तयार होता. नाश्त्याला उपमा, म्हैसूर पाक, शेव होते. पोटभरून नाश्ता केला, कॉफी प्यायलो आणि बाहेर जाऊन बसलो. गणपती बाप्पाची मोठी, सुंदर, सुबक मूर्ती बघून प्रसन्न वाटत होतं. मूर्ती खूप मोठी होती. मी ऐकलं होतं की लालबागच्या गणपती बाप्पाची मूर्ती ह्याच्याहून मोठी असते. थोड्यावेळात मावशीच्या घरातले सर्वजण अंधेरीहून कार करून पोचले होते. मावशीने मला घट्ट पकडले. मामाने विचारले, 'अजून हा झाडावर चढतो का?, मस्ती कमी झाली का नाही'. आई, ताई, मावशी गप्पा मारायला लागल्या आणि मग मी हळूच तिकडून सटकलो. बाप्पाच्या समोर येऊन उभा राहिलो. आताच्या मानाने गर्दी खूप कमी होती. तरी पण लोकं रांगेत येऊन गणपती बाप्पाचे दर्शन व प्रसाद घेऊन बाहेर पडत होते. माइकवरून मामांचं नाव घेण्यात आलं. सर्वजण बाप्पाच्यासमोर उभे राहिलो. मंगल आरती झाली. सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. बाजूला GSB सेवा मंडळाचं ऑफिस होतं. तिकडे कठड्यावर जाऊन बसलो. दहा मिनिटांत पाऊस थांबला. जेवणाची तयारी चालली होती. पंक्तीत जेवण होतं. आम्ही सर्व एकत्र रांगेत बसलो. सर्वांना केळीचं पान ठेवण्यात आलं. जेवणात सुकी भाजी, गरमगरम भात आणि सांबर, शेवटी पायसम होतं. जेवण झाल्यावर थोडावेळ बसलो आणि निघण्याची तयारी. सर्वांनी बाप्पाला नमस्कार केला. मावशीच्या घरातल्यांचा निरोप घेतला आणि निघालो. वाटेत आईने विचारलं, 'पुंडा बाप्पाकडे तू काय मागितलं?' मी निरुत्तर. मला मजा आणि मस्ती शिवाय काहीच सुचत नव्हतं.

सर्व सणांंची वर्णनं सहजपणे केले आहे. काही न बघितले ते बघून झालेला आनंद व्यक्त केला आहे आणि शेवटी गणपती बाप्पा चे दर्शन.छान लिहिले.
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteKhup sunder Pai sir.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteतुमच्या लेखातून असे दिसते की कुठल्याही पहिल्या प्रसंगाचा क्षण न क्षण तुमच्या लक्षात आहेत
ReplyDeleteधन्यवाद.
Delete