पूर्वी आमच्याकडे मुंबईला बॉम्बे म्हणायचो. कुंदापूरवरून मुंबईसाठी एकच बस असायची. आमच्या घरापासून जवळच एक किलोमीटरच्या अंतरावर छोटासा बस स्टॉप होता. जेमतेम पाच बस थांबू शकतील एवढा. मोठा भाऊ मंजुनाथ आम्ही त्यांना 'अण्णा' म्हणायचो ते मी लहान असतानाच नोकरीसाठी मुंबईला आले होते. नंतर ताई "मुक्ता" तिचं नांव. आम्ही तिला 'मुक्ताक्का' म्हणायचो. मग मधला भाऊ "वेंकटेश"— 'वेंकटेश अण्णा'. मी कधीतरी बस स्टॉपवर गेलो की विचार करायचो मला बॉम्बेला जायला कधी मिळेल. तिकडे बस स्टॉपवर बबल गम चॉकलेट मिळायचं ते घेऊन गुपचूप खायचो.. घरुन परवानगी नसायची.
मी सहावी पास होऊन सातवीत गेलो. आमच्याकडे सातवीत बोर्डाची परीक्षा असायची. मी अभ्यास मन लावून करायचो. त्यावर्षी जानेवारी महिन्यात ताईच पत्र आलं की सर्वांनी परीक्षा संपली की मे महिन्यात बॉम्बेला यायचंय. मी मनातल्या मनात जाम खुष झालो होतो. सर्व मित्रांना सांगितलं मी जाणार ते. मित्र थोडे नाराज झाले. तुझ्याशिवाय कसं होईल, आम्ही कोणाबरोबर खेळायचं. माझा खास मित्र 'खाजा' तर रडायला लागला. मी त्याला म्हटलं, मी पत्र लिहीन तुला; तू पण पत्र लिहीत राहा. कसंतरी मित्रांची समजूत घातली. माझं अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हतं. सारखे बॉम्बेला जायची स्वप्ने. तिकडे कसं असेल. मी ऐकलं होतं बॉम्बेला झाडं कमी आहेत इमारती जास्त आहेत. त्या पण मोठं-मोठ्या उंच इमारती. गावात कसं उंच इमारती नव्हत्या पण घर मोठं असायचं बॉम्बेमधे उंच इमारती आणि खोल्या छोट्या. छोट्या घरात खेळायला जागा नाही. अभ्यासही खूप असतो. ट्रेनचा प्रवास करावा लागतो. मी अजून ट्रेन पहिली नव्हती.
कुंदापूर सोडून जावं लागत होतं. मी आनंदात होतो.. मला बॉम्बेला जायला मिळत होतं! कुंदापूरची आठवण— आमच्या घराच्या थोडा पुढे अरबी समुद्र.. तिथून मासे पकडून आणल्यानंतर मासे ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम होती. रूमच्या आत मोठमोठे अल्युमिनियमचे डबे ठेवले होते. त्यात ताजी मच्छी ठेवलेली असायची. बाहेरून बर्फाचे मोठमोठे तुकडे असायचे दार उघडले की थंड हवा.. तो मच्छीचा वास.. आमच्याकडून ही मच्छी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात येत होती.

आमच्याकडे गंगोळी नदी आहे. नदीच्या बाजूला घराची कौलं बनवायची फॅक्टरी होती. त्याचे मालक "तोलार' आमच्या इकडेच राहायचे. ते खूप श्रीमंत होते त्यांच्याकडे पांढऱ्या शुभ्र रंगाची अँबॅसेडर कार होती. ती जातांना दिसली की.. आम्ही सर्व कारच्या मागे धावायचो. त्यांच्या कारखान्यामधे जवळपासच्या सर्व गावांसाठी लागणारी "कौलं' तयार व्हायची. पुष्कळ कामगार होते. कारखान्याच्या बाहेर खूप मोठा मातीचा ढीग असायचा. वेगळीच माती होती ती. एका मशीनमध्ये ही माती आत जायची. माती आत गेली की त्यावर काहीतरी तेलासारखा पदार्थ टाकून मिक्सरने मिक्स करायचे. मग एका भट्टीत जात होती. त्या भट्टीमधे आग लागलेली असायची. मग तिकडून कौलं निघायची. तयार झालेली कौलं बाहेर रचून ठेवायचे. एक-एक ट्रक येऊन कौलं घेऊन जात होते. हे सर्व बघतांना नवल वाटायचं!मज्जाही यायची.
तिकडचा समुद्र, नदी, पांढरी शुभ्र वाळू, लाल माती, नारळाची झाडं,आजी च घर,वेंकटरमण देवस्थान,शाळा, हे सर्व सोडून बॉम्बेला जायचं होतं.
सातवीची बोर्डाची परीक्षा होती. तशी मी पुष्कळ तयारी केलेली. परीक्षा दिली. पास होणार अपेक्षा होती. मे महिन्यामधे निकाल लागला आणि मी नेमका इंग्रजीत नापास झालो.. ते पण फक्त पाच गुणांनी. घरी कोणीच काही बोलले नाही. ताई मुंबईला होती. आई काहीच बोलायची नाही. मला खूप रडायला आलं. पहिल्यांदा मला जाणवलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे— मी नापास झालो. या दरम्यान, आम्हांसर्वांना बॉम्बेला घेऊन जाण्यासाठी ताई येणार असं पत्र आलं होतं. मनात नापास झाल्याची भीती होती. बॉम्बेला जायचं स्वप्नही होतं. सकाळी मी बाहेर अंगणात खेळत होतो. बाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मी बाहेर धावत आलो तर रिक्षा चक्क आमच्याच दाराजवळ थांबली होती. आमच्याकडे कोणी रिक्षाने येत नव्हते. आम्ही चालत जायचो.. चालत यायचो. त्या रिक्षातून एक बाई खाली उतरत होती... बघतो तर.. ताईच होती. सुन्दर साडी.. रंग आठवत नाही.. पायांत चपला.. डोळ्यावर काळा रंगाचा चष्मा. सुंदर दिसत होती. चित्रपटातील नायिकेसारखी. तिने खाली उतरून नवीन पर्स काढली. त्यातले सुटे पैसे रिक्षावाल्याला दिले. मी धावत गेलो.. तिची बॅग उचलली आणि घरात आलो. ताई ओरडली मला, "ऐकलं की नापास झालास!.. तुला कळत कसं नाही बॉम्बेला परत सातवीत बसावं लागेल.. एक वर्ष वाया घालवलंस"!
आम्ही तयारीला लागलो. काही सामान बांधून घेतलं. २६ मे ला सकाळी आमची बस होती आजूबाजूचे सगळे लोकं जमले होते.. माझे मित्रपण होतेच.. सर्वांचा निरोप घेतला. मी, ताई, आई, भाऊ आणि बहीण आम्ही पाच जणं दोन रिक्षाकरून बस स्टॉपला पोचलो. बस आधीच उभी होती. बस मोठी होती. आतमधे 2x2 च्या सीट्स होत्या. मी खिडकीच्या बाजूची सीट पकडली. बस सुरू झाली आणि बॉम्बेसाठी निघाली.....
छान 👌
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteएकदाचा निघालास मुंबईला... फार छान!
ReplyDeleteयेतोच....
Deleteकुंदापूर सोडतांना मनात असंख्य विचाराची झालेली घालमेल .मुंबईत आगमन या दोन गोष्टी कथेवरून लक्षात येतात छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteआता मुंबईत कोणत्या खोड्या केल्या,मस्ती केली ?
ReplyDeleteपुढे कळेलच.
Deleteलिखाण खुप छान आहे. वाचताना मस्त वाटते
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteलेखाला सुंदर कथेचं स्वरुप प्राप्त झालंय
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteबाँबे ला जाण्याची ओढ आणि कुंदापूर सोडण्याचे दुःख दोन्ही छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्त ओघवती भाषा छान वाटतं वाचताना
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteक्या बात है। सुंदर लेख
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteबाँबे ला जाण्याची ओढ आणि कुंदापूर सोडण्याचे दुःख दोन्ही छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखुपच छान लिहिली आहे आठवण.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete