(1978) शिवप्रसाद बिल्डिंगमधल्या सर्वांशी ओळख झाली होती. कुंदापूरपेक्षा जास्त मित्र जमवले होते. 'मुन्ना' माझा खास मित्र होता. शेजारी रमेशभाई पटेल, त्यांची बायको जया बेन, त्यांची मुलं जगदीश, रूपा आणि प्रकाश. 'रमेश भाई' स्टेशनजवळ कलर पेंट व हार्डवेअरच्या दुकानात कामाला होते. दुसरे शेजारी हर्षदभाई शाह, त्यांची बायको जया बेन, त्यांची मुलं हीना, मुन्ना, रुपेश राहायचे. मुन्ना'चे वडील हर्षदभाई टेम्पो चालवायचे. बाकी इमारतीतले, संतोष ओक त्याचा भाऊ समीर. संतोषच्या वडिलांची मानपाडा रोडवर 'श्री टायपिंग इन्स्टिट्यूट' होती. ते टायपिंग आणि शॉर्टहॅन्ड शिकवायचे. अशोक मालदे, मनसुख, शशी पाटणकर, बंटी असे बरेचसे मित्र होते. आम्ही रविवारी क्रिकेट खेळायचो. इमारतीच्या दोन्ही बाजूला जागा होती. मला बॅटिंग जमत नव्हती, मी स्पिन बॉलिंग करायचो. एका बाजूला क्रिकेट खेळतांना चेंडू दूधवाल्याच्या घरात जायचा. 'रामलखन यादव' त्यांचं नाव होतं. त्यांचं समोर दुकान होतं, त्यामागे ते राहायचे. त्यांच्या घरात, ते दह्यासाठी दूध ठेवायचे. आम्ही क्रिकेट खेळतांना त्यांचं दार उघडं असलं की चेंडू नेमका दूधात पडायचा!! ते बाहेर येऊन ओरडायचे. कधी कधी आतून सूरी आणून चेंडू कापून फेकायचे. असे आमचे बरेचसे चेंडू त्यांनी कापले होते. त्यांचंपण नुकसान होत होतं.. आम्ही खेळणार तरी कुठे? एकदा आम्ही गंमत करायची ठरवली!! नेहमी रबराच्या चेंडूने खेळायचो. त्यावेळेला आम्ही सिजनचा कडक चेंडू वापरायचं ठरवलं. खेळायला सुरुवात केली आणि चेंडू नेमका त्यांच्या घरात गेला. रामलखन चेंडू घेऊन बाहेर आले. रागाने सूरीने चेंडू कापायला लागले. चेंडू कडक होता, कापता येईना!! त्यांना जाम राग आला. तो चेंडू त्यांनी तसाच धरून मारला. कोणालातरी तो चेंडू जोरात लागला. मग आम्ही सर्वांनी तिकडून पळ काढला. त्यानंतर बरेचसे दिवस आमचं क्रिकेट खेळणं बंद होतं.
कुंदापूरमधे कन्नड शिक्षण आणि घरी कोंकणी बोलत असल्यामुळे मला फारसं मराठी बोलायला येत नव्हतं. मराठी बोलताना बरेचसे हिंदी, कोंकणी शब्द असायचे. सर्व मित्र मस्करी करायचे. मी, मुन्ना, संतोष, समीर, रुपेश 'काकी स्मृती'मधला बंटी असे बरेचसे मित्र एकत्र असायचो. मी झाडावर चढतो हे सर्वांनाच माहिती होतं. माझे कुंदापूरचे किस्से त्यांना माहीत होते. आमच्या बिल्डिंगच्यामागे टाटा पॉवर लेनच्या पलीकडे एक टाईल्सची कंपनी होती. 'लतिका टाईल्स' असं त्या कंपनीचं नाव होतं. त्या कंपनीच्या जागेचे मालक बाजूच्याच इमारतीत राहायचे. 'लतिका टाईल्स' कंपनीचे मालक भांडुपला राहायचे. ते कधी कधी सकाळी कंपनीत येऊन संध्याकाळी परत जायचे. 'पंडित' म्हणून एक कामगार दिवसभर तिकडे असायचा. त्याला आम्ही बाबू म्हणायचो. माझी छोटी ताई प्रेमक्का 'लतिका टाईल्स' कंपनीत अकाउंटंट म्हणून कामाला लागली होती. तिने बारावी कॉमर्स करून पुढचं अकाउंटस्'चं शिक्षण केलं होतं. अण्णांनी तिला जाड जाड शुक्ला अगरवाल, बाटलीबॉयसारखी अकाउंटस्'ची पुस्तके आणून दिली होती. अकाउंटस्'मधे ती हुशार होती. ती रोज सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सहावाजेपर्यंत कंपनीत कामावर असायची. कंपनीत तिला रविवारी सुट्टी असायची. लतिका टाईल्स कंपनीचं सात-आठ जण बसू शकतील असं छोटसं ऑफिस होतं. बाहेर खूप मोठी जागा होती. वेगवेगळ्या प्रकारच्या टाईल्स पाण्यात भिजवून ठेवलेल्या असायच्या. त्यांचा कारभार मोठा होता. टाईल्सच्या भरपूर ऑर्डर्स असायच्या. कंपनीच्या आजूबाजूला भरपूर झाडं होती. आंबा, फणस, चिकू, पेरु अशी मोठमोठी झाडं होती. मी आणि माझे मित्र कधी कधी प्रेमक्काला भेटायला कंपनीत जायचो. चिकूच्या झाडाला भरपूर चिकू असायचे आणि पेरूच्या झाडाला पेरू! फळं कोणी काढली नव्हती. माझे मित्र म्हणायचे, "पुंडा, तेरेकु झाड पे चढनेको आता है ना.. चल.. चढ के दिखा!!" मी म्हणायचो, "मार खायचा आहे का? ती आपली जागा नाही, ते आपल्याला ओळखंत नाहीत". प्रेमक्का नुकतीच कामाला लागली होती. मित्र मागेच लागले होते, आपण चिकू किंवा पेरू काढून खाऊया! मी म्हटलं, ठीक आहे.. आपण प्लॅन करूया. आधी बघितलं कुठल्या झाडांवर फळं आहेत. एकदा जाऊन निरीक्षण केलं. चिकूच्या झाडावर भरपूर चिकू होते.. पण ते कच्चे होते.. अजून कच्चे होते म्हणून काही उपयोग नव्हता.. काढून खाता येणार नव्हते. पेरुच्या झाडावर मस्त पेरू होते!! त्यात काही पेरू पिकायलापण आले होते. थोडे पिवळे व्हायला आले होते. पेरू थोडेसे पिवळे झाले की खायला गोड असतात. म्हटलं पेरू काढले तर खाता येतील. रविवारी कंपनीचं ऑफिस बंद असायचं. पण तो बाबू असायचा. मग जेव्हा तो झोपतो तेव्हा दुपारच्या वेळेला जायचं ठरलं. त्यादिवशी माझ्या बरोबर कोण कोण होतं लक्षात येत नाही. रविवारी दुपारी आम्ही सगळे हळूच कंपनीचं गेट उघडून आत गेलो. बाबू गाढ झोपला होता. मी आत जाऊन पेरुचं झाड गाठलं. बाकीचे माझ्या मागे होते. सर्वांना आवाज करायचा नाही आणि शांत राहायला सांगितलं. मी झाडावर चढलो. पेरुचं झाड मजबूत असतं. बारीक फांदी जरी असली तरी ती सहज तुटत नाही. बऱ्याच फांद्या असल्यामुळे आरामात चढता येतं. तसंच उतरताही येतं. पेरुच्या फांद्या गुळगुळीत असतात. बरेच पेरू होते, त्यातल्या त्यात पिकलेले आणि लगेच खाता येतील असे पेरू तोडून खाली उभ्या असलेल्या मित्रांच्या हातात टाकत गेलो. खाली उभे असलेले मित्र हाताने कॅच पकडत होते. खाली पडले असते तर आवाजाने तो बाबू आला असता. अजून एक-दोन पेरू राहिले होते. त्यातला एक काढून खाली टाकायला गेलो तर खाली कोणीचं नव्हतं!.. पेरू पण नव्हते.. सर्व मित्रही पळाले होते.. मी घाबरलो.. काही तरी गडबड आहे!.. हातातला पेरू तिकडेच टाकला आणि झाडावरून माझ्या नेहमीच्या पद्धतीने सपकन खाली उतरलो. शेवटच्या फांदीवरून खाली उडी मारली. नशीब माझ्या हातात पेरू नव्हते. मी गेट उघडून बाहेर पडायच्या आधीच मागून कोणीतरी माझा शर्ट धरला. मागे वळून बघतो तर बाबू!! मी घाबरलो होतो.. त्यानी मला ओळखलं नाही. तो ओरडायला लागला. कंपनीत घुसून चोरी करतोस?.. काय काय काढलं सांग.. तुझे बाकीचे मित्र कुठे गेले सांग?.. मी घाबरलो.. मित्र पळाले होते. मी एकटाच पकडला गेलो. मग मी माझं अस्त्र वापरलं. ढसाढसा रडायला सुरुवात केली. माझ्या मित्रांनी सांगितलं म्हणून मी चढलो.. मी पेरू खाल्ला नाही.. तुमच्याकडे कामाला आहे ना.. त्या प्रेमक्काचा मी छोटा भाऊ आहे.. परत नाही करणार.. वगैरे. पण त्याने मला सोडलं नाही. बाजूच्या इमारतीत कंपनीच्या जागेचे मालक राहत होते. माझा कान पकडून त्यांच्या बिल्डिंगखाली घेऊन गेला. खालून त्यांना हाक मारली.. तसे ते बाहेर आले.. त्यांनी विचारलं काय झालं?.. बाबू बोलला, "ह्याने पेरूच्या झाडावर चढून पेरू काढले आणि सर्व मित्रांना दिले. ह्याचे मित्र पळाले, हा फक्त माझ्या तावडीत सापडला". मालकाने मला विचारले काय केलं सांग.. मी बोललो.. मी कंपनीत काम करणाऱ्या प्रेमक्काचा भाऊ आहे. माझ्या बरोबर मित्र होते. मला झाडावर चढता येतं म्हणून मी सर्वांना पेरू काढून दिले पण ते पळाले. त्यांनी मला समजावून सांगितलं, असं नाही करायचं.. जर फळं काढायची असतील तर विचारलं पाहिजे.. परत असं करायचं नाही. मग बाबूला म्हणाले तो प्रेमाचा भाऊ आहे जाऊ दे त्याला. बाबूने माझा पकडलेला कान सोडला. बाबूने सोडताच मी पळत सरळ बिल्डिंगमध्ये आलो. सर्व मित्र लपून पेरू खात बसले होते. त्यांना विचारलं, 'मी तुम्हाला पेरू काढून दिले आणि तुम्ही मला एकट्याला सोडून पळून आलात? तसे ते बोलले, 'तुझी बहीण तिकडे कामाला आहे म्हणून तुला सोडलं. अाम्हाला पकडलं असतं तर बाबूने आम्हाला बेदम मारलं असतं!'

It's a learning experience from small small things.
ReplyDeleteYou are blessed to get such an opportunity
Indeed.
Deleteलहानपण देगा देवा म्हणतात ते उगीच नाही. सुंदर !!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्त अनुभव
ReplyDeleteमला माझे बालपण आठवले
धन्यवाद.
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
Delete