२७ मे, १९७७ ला डोंबिवली स्थानकावर उतरलो. आम्ही पाचजण. मी, आई, भाऊ, बहीण, ताई आणि जिजाजी आम्हाला घरापर्यंत सोडायला आले होते. डोंबिवली स्टेशनवरून जिना चढून खाली उतरलो. समोर तिकीट घर होतं. थोडं पुढे टांगा उभा होता. आम्ही दोन टांगे केले. एका टांग्यात जिजाजी आणि एकात ताई आमच्या सोबत होते. टांग्यात बसलो.. पहिल्यांदाच टांग्यात बसलो होतो. घोड्यांच्या टापांचा आवाज. रस्त्यावर लोकांची गर्दी, टांगा आलेला बघून माणसं सरकत होती. भाजी मार्केटमधून टांगा निघाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर भाज्या होत्या. पहिल्यांदा एवढ्या भाज्या बघितल्या. लाल लाल टोमॅटो, मोठी काकडी, कोबी, फ्लॉवर, भेंडी, हिरव्या भाज्या, शेंगा, मसाले, मिरची, आलं, कोथिंबीर, कडीपत्ता, वगैरे. पुढे फळं पण होती. चिकू, संत्री, आंबा, डाळिंब, वगैरे. लोक भरपूर खरेदी करत होते. टांगा पुढे जात होता. सिमेंटचा रस्ता होता. पुढे एक उंच इमारत होती. एक वळण आलं, थोडंस पुढे येऊन टांगा थांबला. ताई बोलली आपलं घर आलं. दोन मजली इमारत होती.
आमच्या घराचा पत्ता..
दुसरा मजला, शिवप्रसाद बिल्डिंग, डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, टिळक नगर, डोंबिवली पूर्व.
दुसऱ्या मजल्यावर पोचलो. शेवटचं घर होतं. बाजूला दोन घरं होती. सर्व बाहेर आले होते. त्यांना आम्हाला बघायचं होतं. जास्त करून मला; माझी कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती. हा कसा दिसतो.. हा कशी मस्ती करत असेल.. झाडावर कसा चढत असेल? एकीने तर मला पकडलं.. "यही है न पुंडा" पण मी तिच्या तावडीतून सुटलो आणि धावत घरी आलो. छोटंसं घर होतं. बाहेर एक खोली एक पलंग होता. पलंगावर अण्णा झोपले होते. त्यांना कावीळ झाली होती. डोळे पिवळे पडले होते. आई अण्णांना बघून रडायला लागली. आमचे अण्णा दिसायला सुंदर क्रिकेटपटू बॉब विलिस सारखे. पण कावीळीमुळे तब्येत खराब झाली होती.
घर छोटं होतं. एक खोली आणि छोटसं स्वयंपाक घर. नवीन शेजारी असल्यामुळे कोणाची ओळख नव्हती. काही दिवसांत मी आजारी पडलो. रोज संध्याकाळी मला ताप यायचा. भावाबरोबर डॉक्टरकडे गेलो. घरापासून जवळ मानपाडा रोडवर डॉक्टर ठोसर यांचा दवाखाना होता. कोण आजारी पडलं की ताई-अण्णा डॉक्टर ठोसरांकडे जायचे. त्यांचं औषध घेऊन पण ताप कमी नाही झाला. रक्त तपासणी झाली. टायफॉईडचं निदान झालं. मला ऍडमिट करायला सांगितलं. भावाचे मित्र श्रीधर अण्णा यांनी डॉक्टर राव यांच्याकडे मला घेऊन जायला सांगितलं. डॉक्टर रावांकडे जायचं ठरवलं. रिक्षा करून स्टेशनला आलो. समोर कामत मेडिकल होतं. तिकडे उतरलो. डाव्याबाजूला जी इमारत होती त्यात दुसऱ्या मजल्यावर श्रीनिवास हॉस्पिटल होतं. अंगात त्राण नव्हतं. कसाबसा दोन मजले चढलो. हॉस्पिटलच्या आत आलो. बरेचसे आजारी माणसं बसली होती.
'श्रीनिवास हॉस्पिटल' खूप मोठं होत. एका टेबलवर बाई बसली होती. बाजूला बंद दरवाजा. ती सारखं आत-बाहेर ये-जा करत होती. दरवाज्यावर इंग्लिशमध्ये Dr U Prabhakar Rao लिहीलं होत. समोरच्या टेबलवरची बाई एक-एक करून रुग्णांना आत पाठवत होती. बाजूला काचेचं छोटं केबिन होतं. त्यात सिस्टर्स बसल्या होत्या. बेल वाजली की त्या रूममधे जात होत्या. केबिनच्या बाजूला गणपतीची मूर्ती होती. समोर महाभारताचं पोर्ट्रेट होतं. माझा नंबर आला.. आम्ही आत गेलो. डॉक्टरांनी मला पाहिलं.. भाऊ बोलला याला सारखा ताप येतोय, उतरत नाही. ब्लड रिपोर्ट दाखविले. त्यांनी विचारलं काय होतंय तुला? मला बाजूच्या पलंगावर झोपायला सांगितलं. मला तपासण्यासाठी माझा हात त्यांच्या हातात घेतला.
'राव'डॉक्टर दिसायला सुंदर होते. गोल हसरा चेहरा, काळे केस, पांढऱ्या शुभ्र रंगाचा ड्रेस, त्यांचं बोलणं प्रसन्न वाटत होतं. माझा हात धरून बोलले काही दिवस थांबावे लागेल. एकदम ठणठणीत होशील. बाहेरच्या बाईला आणि सिस्टर्सना बोलवून मला ऍडमिट करून घ्यायला सांगितलं. उजव्याबाजूला तिसऱ्या रूममध्ये माझा कॉट होता. माझ्या बाजूला एक छोटंसं बाळ होतं. ताप आणि उलट्यांमुळे पोटात काही जात नव्हतं. खूप अशक्तपणा आला होता. मी कॉटवर झोपलो. इतक्यात सिस्टर्स आल्या आणि मला सलाईन दिलं. घरून पेज आणि लोणचं आलं होतं. जेवून झाल्यावर, गोळ्या घेऊन झोपलो. सकाळी जाग आली तेव्हा आया, सिस्टर्स धावपळ करत होते. एका सिस्टरने थर्मामीटर ने ताप चेक केला. घरून नाश्ता आला. इडली होती.. खाऊन घेतलं. अकराच्या सुमारास सर्व ठिकाणी शांतता होती. मी विचार करत होतो.. एव्हढा आवाज अचानक कसा बंद झाला. बघतो तर राव डॉक्टर रुग्णांना बघायला आले होते. माज्या खोलीत आले. आधी समोरच्या कॉटवरच्या मुलाला तपासलं. त्याच्या घरच्यांना धीर दिला. सिस्टर्सना औषध बदलायला सांगितलं. माझ्याकडे वळले. मला विचारलं "कशी असा तूं?" 'म्हणजे तू कसा आहेस' मी बोललो कालच्यापेक्षा बरा आहे. काळजी नको करू.. सर्व ठीक होईल.. लवकर बरा होशील. जेमतेम एक मिनिट उभे असतील लगेच दुसऱ्या वॉर्डमधे निघून गेले. ते आत जाईपर्यंत शांतता होती. मला खूप अशक्तपणा आला होता. मी दिवसभर पलंगावर पडून असायचो. सलाईन सुरूच होती. गोळ्या होत्या. ताई-अण्णा कामावर जायचे. संध्याकाळी बघायला यायचे. माझं हे रूप त्यांनी पाहिलं नव्हतं. एक मिनिट गप्प न बसणारा आज झोपून होता! अण्णा रोज येताना पार्ले बिस्कीट आणायचे. घरून सकाळी इडली, दुपारी जेवणाला पेज आणि लोणचं असायचं. चार दिवसांनी मला बरं वाटायला लागलं, ताप उतरला होता. थंडी वाजत नव्हती. घाम यायला लागला. मग, मी कुठे बसतोय?सलाईन असतांना कॉटवर.. ते संपलं की बाहेर रिसेप्शनपर्यंत फिरायचो. बाजूला वॉशरूम होतं. तांब्यातलं पाणी ओतायचो आणि बेल वाजवायचो. लगेच आया यायच्या. त्यांना प्यायचं पाणी आणायला सांगायचो. पाचव्या दिवशी ब्लड टेस्ट झाली. राव डाक्टरांनी तपासले. रिपोर्ट बघून कोंकणीत बोलले "रिपोर्ट नॉर्मल असं तुवां फायी घरकडे वचैत".. 'तुझा रिपोर्ट नॉर्मल आहे, तू उद्या घरी जाऊ शकतोस. संध्याकाळी डिस्चार्ज होता. राव डॉक्टर आले श्रीधरअण्णा आणि भाऊ केबिनमधे गेले पेपर्स घेऊन बाहेर आले. मी ठणठणीत झालो होतो. गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि हॉस्पिटलमधून खाली उतरलो. भावाने समोरच्या कामत मेडिकलमधे राव डॉक्टरांनी दिलेली चिट्टी दाखवून औषधं घेतली. रिक्षा पकडून घरी पोचलो. नंतर मला समजलं आमच्याकडे पैसे कमी होते. आधीच अण्णा पण राव डॉक्टरांकडे ऍडमिट होते; आता माझा खर्च! ते म्हणाले "आता नसतील तर पुढे कधी दिले तरी चालेल!!". त्यांचा साधेपणा, ट्रीटमेंट, त्यांचं बोलणं, व्यक्तिमत्व असे आपल्या डोंबिवलीला डॉक्टरांच्यारूपात लाभलेला देव माणूस!
Doctor U Prabhakar Rao

डॉ.राव हे डोंबिवलीतले सर्वात जुने डॉक्टर आहेत. त्यांच्या बद्दल सर्व डोंबिवलीकरांना इतकाच आदर आहे. एक छान आठवण!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteडॉ. राव यांचे डोंबिवली त फारच योगदान आहे ते विसरता येत नाही. त्याच्या कार्याला नमस्कार. तुम्ही सोप्या भाषेत छान लिहिले धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदर
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteDr Rao mamana changale aarogy labho hich eeshwar charani prarthana
ReplyDelete🙏🏻
DeleteKhupach jiwant ani sunder varnan.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteडॉक्टर राव आदरभाव या दोन्ही एकच गोष्टी आहेत.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसुंदर वर्णन !!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमला खुप छान अनुभव आहे.१९९६ ला वडिलांचे cancer che operation kele. operation karnyapurvi mla mhanale jase tuze baba chalat ale tasech chalat ghari yetil 8 divsat. 90 min operation chalel ase sangitle hote pan actually sade char tas operation chalale. cancer khup pasarla hota.khup kaushalyane kidney la vachvun operation kel hot dr.ni. he nantar asst.dr.kadun kalale. pan sangitlya pramane 8 vya divshi mi babana gheun ghari gele. matra tyani jast vel operation chalale tyachi fee pan nahi wadhavli. khup adar ahe mla tyanchyabaddal.🙏🙏
ReplyDeleteबरं वाटलं तुमच्या अनुभवावरून, खरंच ते महान आहेत.
DeleteBeautiful written article about a truly amazing person and know that there isn't one family that has not been to him in Dombivali, an all-rounder of Medical profession and Messiah to the people there, also know all his three brilliant children who are as good a doctor as he his. A family of Doctors Dombivali is indebted to. God Bless
ReplyDeleteThank you for the compliments.
DeleteIam feeling proud that Iam working in Dr. U. P. Rao Sir Mamata HOSPITAL
ReplyDeleteI too am grateful to Dr. U. P. Rao
DeleteDr.U.Prabhakar Rao was First Surgeon, best Doctor,My best Friend in Dombivli since I started my practice in Dombivli from 1980.
ReplyDeleteI wholeheartedly agree with you.
Delete