(1979) मी आठवी पास होऊन नववीत गेलो .मे महिन्याची सुट्टी होती .इमारतीतले बरेचसे मित्र गावाला गेले .जे मित्र होते त्यांच्याबरोबर पत्ते खेळायचो. पत्ते खेळताना जोरदार भांडण ही व्हायची, बाजूच्यांचे पत्ते बघून खेळतो ,पत्ते असून टाकत नाही वगैरे. त्या भांडण्यामागे पण प्रेम असायच .भांडण खेळण्यापूरतच खेळ संपला की परत सर्व एकत्र!!क्रिकेट मॅच असलं की मुन्नाच्या घरी, मी ,मुन्ना ,रुपेश आणि अजून कोण मित्र आले तर.मॅच बघताना गरम गरम खायलाही मिळायचं.मुन्नाची आई जयाबेन आणि बहीण हीना मस्तपैकी खायला आणून ठेवायचे .हीना चांगले पदार्थ बनवायची आणि तशी तिला नवीन पदार्थ बनविण्याची आवड होतीच. खरं तर मुन्नाचे घर माझं दुसरं घर होत. त्याचे वडील हर्षद भाई पण मला खूप आवडायचे शांत आणि प्रेमळ स्वभावाचे .
मे महिना संपत आला होता.काही दिवसांनी शाळा सुरू होणार होती.मला कधी एकदा शाळा सुरू होणार असं झालं होतं.एक सकाळी साडे दहाला घरून बाहेर पडलो की सरळ सात वाजता घरी यायचो. तो ट्रेनचा प्रवास,शाळेतील मित्र शाळेतील मस्ती खूप मजा यायची .
त्यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता.जून तेरा तारखेला शाळा सुरू होणार होती .आमचं स्वतः च पुस्तकाचं दुकानं होत.आम्ही दुकानात कन्नड पुस्तक ठेवत नव्हतो.अण्णाने माझ्यासाठी नववीची कन्नड माध्यमाची पुस्तक आणली.प्रेमक्काने पुस्तकांना, वह्याना कव्हर घालून दिले. आठवीचे कपडे होते त्यामुळे नवीन कपडे शिवले नव्हते.सर्व तयारी झाली होती .बुधवारी जून तेरा तारखेला शाळा सुरू होणार .जोरदार पावसाला सुरुवात झाली.काही दिवस सतत पाऊस पडत होता .शाळेत जाण्यासाठी माझ्याकडे छत्री नव्हती घरून डोंबिवली स्टेशन,मुलुंडवरून शाळा इथपर्यंत चालत जावं लागतं होतं.मुलुंड स्टेशनवरून शाळा तशी लांब होती .जवळ जवळ अर्धा तास चालत जावं लागायचं,त्यामुळे छत्री किंवा रेनकोट आवश्यक होतं..प्रेमक्का,वहिनीने मिळून मला काळ्या रंगाची गोल हातवाली नवीन छत्री आणली. नवीन कुठलीही वस्तू आणली की ती मला जवळ लागायची.त्यादिवशी मी छत्री जवळ घेऊनच झोपलो होतो.
बुधवार तेरा जुनं १९७९ शाळेचा नववीतला पहिला दिवस .सकाळचं नास्ता करून डबा घेऊन दप्तर,नवीन छत्री सर्व तयारीने शाळेसाठी निघालो.
नेहमीप्रमाणे अकरा दहाची गाडी होती .वाटेवर डोंबिवलीहून जाणार माझा मित्र हरीश शेट्टी पण भेटला.पहिलाच दिवस होता दोघांनी मुलुंडच रिटर्न तिकीट काढलं.शाळेत गेलो की स्कूल कनसेशन फॉर्म भरणार होतो जेणे करून पास काढता येणार होतं. तिकीट काढून दोन नंबर प्लॅटफॉर्मवर पोचलो. गाडी आली आम्ही दोघे गाडीवर चढलो. नेहमी कल्याणवरून रेमंड रोद्रीगस,अंबरनाथ वरून चेलुवादी तिमप्पा डब्यात असायचे.आज शाळेचा पहिलाच दिवस त्यामुळे मी आणि फक्त हरीश होतो. लोकलला गर्दी कमी होती. नेहमीप्रमाणे आम्ही बाहेरच दारात उभे होतो.महिन्याभरात केलेल्या गोष्टीं एकमेकांना सांगत होतो.मी हरीशला हाजी मलंग गडची सहल पण सांगितली.गप्पा मारता मारता ठाणे स्टेशन आलं,पुढचं स्टेशन मुलुंड ,आम्ही अजून डाव्या बाजूच्या दारावर उभे होतो .गाडीने ठाण्याच्या ब्रिज क्रॉस केला तेव्हा एकच ब्रिज होता.इतक्यात माझ्या हातून नवीन छत्री सटकली आणि ट्रेनमधून खाली पडली .मला खूप रडायला आलं .बाहेर बघितलं रुळावर कोण दिसतंय का? कोणचं नव्हतं.पण छत्री दिसत होती .काय करायचं सुचेना? हरीश पण घाबरला .मुलुंड स्टेशन आलं आम्ही दोघे उतरलो.हरीशला सांगितलं तू पुढे जा मी येतो छत्री घेऊन .तसाच एक नंबर प्लॅटफॉर्म वर गेलो तिकडून ठाणे लोकल पकडली .ट्रेन सुटल्यावर दरवाजात उभे राहून दोन्ही बाजूला छत्री कुठे दिसते का बघितलं. छत्रीचा नामोनिशाण नव्हत .मी रडकुंडीस आलो घरी काय सांगू कष्ट करून नवीन छत्री घेऊन दिली होती. अजून मी एकदाही छत्रीचा वापर केला नव्हता .ठाणे स्टेशनवर उतरलो .काय करायचं विचार करत होतो.सरळ रुळावरून मुलुंड जायचं ठरवलं .चालत प्लॅटफॉर्म वरून खाली उतरलो .मुलुंडच्या दिशेने रुळावरून चालत निघालो. ठाण्याच्या एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला एक रिकामी ट्रॅक होतं. त्या ट्रॅकवरून गाड्या येत जात नव्हत्या. रुळावर पूर्वेकडुन पश्चिमेला जाणारी माणसं, अजून काही रेल्वे कर्मचारी काम करत होते मला रडायला येत होतं. शाळेचा गणवेश पाठीवर दप्तर बघून मला काही लोकांनी कुठे चाललास?काय झालं? विचारलं. मी छत्री पडल्याची सांगितलं .त्यांनी मला विचारलं कुठे पडली? कशी पडली? इतका वेळ तिकडे छत्री असेल का?तू सरळ गाडी पकडून शाळेत जा. छत्री मिळण्याची शक्यता कमी आहे!!त्यांचं ऐकून अजून रडायला आलं. तरी मी रुळावरून सरळ चालत होतो .नशीब पाऊस नव्हता ऊन फार भयंकर होत.त्यात ती तापलेली पटरी. वीस मिनिट चालल्यावर ब्रिज आला. आजूबाजूला जाम घाण होती,घाणेरडा वास पण येत होता .नाक बंद करून पुढे निघालो .आता मात्र काही झाडी लागली .काही दिवसांपूर्वी पाऊस आल्यामुळे हिरवळ होती .माझ्या डोळ्यासमोर फक्त छत्री दिसत होती.आजूबाजूला शोधत होतो .थोडं पुढे गेल्यावर जिथे छत्री पडली होती तिकडे काही माणसं दिसली पण छत्री नव्हती. त्या माणसांना विचारलं एका तासापूर्वी ट्रेनमधून माझी छत्री पडली होती कोणी बघितली का?ते बोलले अरे इतका वेळ छत्री थोडी राहणार !!इथं तर नाहीये आम्ही नाही बघितली.काय करायचं कळेना चालून चालून पाय दुखायला लागले.ट्रेकच्या आजूबाजूला बाजूच्या झाडीत कुठेच छत्री सापडली नाही. जवळ जवळ एक तास चालत होतो. एवढं करूनसुद्धा निराशाच हाती लागली .तसाच मुलुंड स्टेशनच्या एक नंबर प्लेटफॉर्म वर पोचलो.समोर घड्याळात दीड वाजायला आले होते .समजा शाळेत गेलो तर दोन वाजले असते. शाळेचा पहिलाच दिवस होता शाळा लवकर सुटणार ,जाऊन काहीच उपयोग नव्हता.छत्री हरवल्यामुळे हताश झालो होतो .घरी काय सांगायचं घरचे काय बोलतील मनात विचार येत होते.तेवढयात ट्रेन आली तिच ट्रेन पकडली.पाय दुखत होते,भूक ही लागली होती .सरळ आत जाऊन बसलो. दप्तर मधून वहिनीने दिलेला डबा काढला, सर्व डबा संपवून टाकला .परत तेच विचार घरी काय सांगू .डोंबिवली स्टेशनला उतरलो थोड्या वेळात घरी पोचलो .एवढ्या लवकर कसं काय आलास ? घरच्यांनी विचारलं खोटं बोललो, शाळेचा पहिला दिवस होता ना म्हणून शाळा लवकर सुटली.आईने विचारलं नवीन छत्री घेऊन दिलेली दिसत नाही हरवलीस की काय? तेव्हा मात्र खरं सांगावं लागलं .मला रडू आवरलं नाही,ढसा ढसा रडायला लागलो घडलेलं सर्व सांगितलं.आईला खूप वाईट वाटलं एका छत्रीसाठी हा एवढा चालत गेला !! सर्वांनी बजावलं या पुढे ट्रेनच्या दरवाजेत उभा राहच नाही, रुळावरून चालायचं पण नाही. रडू नकोस आम्ही दुसरी छत्री घेऊन देऊ तुला ..आईने जेवण वाढलं,थोडंसंच जेवलो कधीच दुपारी न झोपणार थकून गेल्यामुळे झोपून गेलो झोपताना रुळावरून चाल्यासारखे दिसत होतं . वयाच्या चौदाव्या वर्षी रुळावरून ठाणे ते मुलुंड एकटा चालत जाण्याचा पराक्रम मी केला होता ......

शाळेचा पहिला दिवस किती आनंददायी पण छत्री पडल्याने आनंदावर विरजण पडले. पण केलेले साहस फार कठीण होते. मनाला भावना भिडल्या.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteपण छत्री मिळाली?
ReplyDeleteमि पण हे धाडस केले आहे, माझी चप्पल दिवा डोंबिवली च्या मध्ये पण दिवा स्टेशन व मार्तण्डेश्र्वर देवळाजवळ पडली होती,
एक वेगळाच अनुभव आहे ना....
Deleteआपल्या जवळची आणि कष्ट करून मिळालेली वस्तू हरवली तर काय तगमग होते याचे उत्तम वर्णन तुम्ही केले आहे
ReplyDeleteवाचण्याऱ्या प्रत्येकाला आपली अशीच गोष्ट आठवली यामध्ये तुमच्या लिखाणाचे यश आहे.
धन्यवाद.
Deleteत्या निमित्ताने दारात उभे राहणे बंद झाले हे उत्तम !
ReplyDeleteते फक्त थोड्या दिवस साठीच होतं.
Delete