संपूर्ण चार वर्षे सातवी ते दहावीपर्यंत मुलुंडला शाळेत जायला लागल्यामुळे ट्रेनचा प्रवास नकोसा झाला होता. दुसरं म्हणजे मला पुढच्या शिक्षणासाठी डोंबिवलीच्या बाहेर जायची इच्छा नव्हती. डोंबिवलीतच पेंढरकर कॉलेजात प्रवेश मिळाल्याने मला समाधान वाटत होतं. आता मला दुकानात ही वेळ देणं शक्य होणार होतं. कॉलेजला जायची तयारी करायची होती. कॉलेजला जायला माझ्याकडे पॅन्ट-शर्ट नव्हते. मी कधीच घरी काहीच विचारत नव्हतो. कुठल्याही वस्तूंसाठी माझा आग्रह नसायाचा. अण्णांनी माझ्यासाठी शर्ट आणि पॅन्ट पीस आणले, आमच्या इमारतीतल्या दिलीप टेलर कडून एका दिवसात शिवूनही घेतल. पुस्तकं आमच्या दुकानात होतीच पण अण्णा बोलले की अकरावीला फक्त मराठी, इंग्लिश, हिंदी चे पाठ्यपुस्तके असतात बाकीच्या विषयांसाठी निरनिराळे प्रकाशन व लेखकाचे पुस्तके असतात ते कॉलेजमध्ये सांगतील तसे घ्यावे लागणार.
कॉलेजचा पहिलाच दिवस होता. टिळकनगरमधून कॉलेजला जाणार ओळखीच कोणही नव्हत. मी एकटाच चालत निघालो. चालत जाताना मनात वेगवेगळे विचार येत होते. वर्ग कसा असेल? वर्गात ओळखीच कोण असेल का? सर काय प्रश्न विचारतील? याच विचारात कॉलेजला पोचायला अर्धा तास लागला. दुपारची वेळ होती. कॉलेजमध्ये पोचल्यावर वर्गाची चौकशी केली माझ नाव ब वर्गाच्या तुकडीत होत. इमारतीच्या बाजूला सिमेंटच्या पत्र्याच शेड होतं त्यात माझा वर्ग होता. वर्गात ओळखीच कोणच नव्हतं. मी तस स्वतःहून कोणाशी सहजपणे बोलत नव्हतो. कॉलेजमधल पहिलं लेक्चर सुरू होण्याआधी कॉलेजचे प्रिन्सिपल प्रा. N.G.kale आणि कोणतरी त्यांच्याबरोबर वर्गात आले. काळे सर दिसायला सुंदर होते ते मराठी आणि इंग्रजीमध्ये आम्हाला समजेल असं बोलत होते. ते बोलले की आज आपल्याला विको कंपनीचे मालक श्री. पेंढरकर यांच्यामुळे ही जागा मिळाली आहे, त्यामुळे डोंबिवलीत या कॉलेजची स्थापना झाली. तुम्हा सर्वांना संधी मिळाली या संधीचा तुम्ही नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करावा. काळे सरांनी अकरावी व बारावीसाठी OC आणि SP ची पुस्तकही लिहिली होती. विपुल प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली होती. काळे सरांच्या संभाषणानंतर पहिल्या लेक्चरला सुरुवात झाली. इंग्लिश मराठी/हिंदी Economics (Eco), Book Keeping(B.K.), organization of Commerce(O.C.) आणि Secraterial practice(S.P.) असे सहा विषय होते. मराठी किंवा हिंदी पैकी मी हिंदी निवडलं होतं. BK साठी खिस्ती सर, हिंदी ला पाटील मॅडम, OC & SP साठी डॉली मॅडम आणि ECO ला एक साऊथ इंडियन मॅडम होत्या. अकरावी म्हणजे कॉमर्सच्या पुढच्या टप्प्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मी प्रत्येक लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचो. अकाउंट्स मधला बेसिक रुल अजून ही माझ्या डोक्यात घट्ट बसलाय Debit What Comes In & Credit What Goes Out. हे तत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा खूप महत्वाचं आहे.दुकानात सुद्धा हे मला खूप उपयोगी पडणार होत. सुरुवातीला मला वाटायचं की कॉलेजला गेल्यावर इंग्रजीमध्ये बोलायला लागेल की काय? सर्व सर इंग्रजीमध्ये बोलत असतील तर. आधीच माझं इंग्रजी कच्च होत मला इंग्रजी बोलायला, लिहायला आणि वाचायला अजिबात येत नव्हतं. पुढे कसं होईल? मला जमेल का? असे सर्व प्रश्न मनात होते पण जसं जसं कॉलेज जायला लागलो माझ्या मनातील भीती कमी होत होती. कॉलेजमध्ये ओळखी झाल्या सर पण ओळखायला लागले. अकाउंटचे खिस्ती सर मस्त शिकवायचे त्यांचं व्यक्तीमत्व खूप चांगलं होतं. ते जास्त करून मराठीत बोलायचे लेक्चरच्या अधून-मधून त्यांचे जोक्स पण असायचे. पाटील मॅडम हिंदी शिकवायच्या त्यांचं हिंदी वरच प्रभुत्व कमालीचं होत. त्या उदाहरणं पण चांगलं देत असायच्या असं वाटायचं की हिंदीचा तास संपूच नये. OC आणि SP माझे आवडते विषय होते. डॉली मॅडम, त्यांच नाव आठवत नाही पण सर्वजण त्यांना डॉली मॅडम म्हणायचे. त्यांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली होती. फक्त इंग्रजीचा तास माझ्या डोक्यावरून जायचा. तरी पण मी खूप समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. ऑक्टोबरमध्ये परीक्षा झाल्या. मी परीक्षेची तयारी चांगला केल्यामुळे सर्व विषयांमध्ये मला पन्नास पेक्षा जास्त गुण मिळाले. हळूहळू मी कॉलेजमध्ये रमायला लागलो. योगेंद्र ओझे हा माझा कॉलेज मधला एकमेव मित्र बनला. जास्त करून कॉलेजमध्ये आम्ही दोघे एकत्र असायचो. एखाद लेक्चर नसलं की आम्ही कॉलेजच्या मागे भूत बंगला होता तिकडे जायचो. असं ऐकलं होतं की तिथे आधी घोडे बांधायचे त्यामुळे कधी कधी घोड्यांचा आवाज येतो. मी कधी कुणालाच घाबरायचो नाही त्यामुळे आम्ही बिनदास तिथे फिरायला जायचो. कॉलेजची इतर मुलं ही असायची. लेक्चरला सुरुवात होण्या आधीच परत वर्गात असायचो.
आमच्या कुंदापूरमध्ये भंडारकर्स कॉलेज होतं आणि इथे डोंबिवलीत पेंढरकर कॉलेज हा एक योगायोग होता. मी कुंदापूरमध्ये असताना कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला लपुनछपून जायचो. आता माझा कॉलेजच स्नेसंमेलन होतं. सुरुवातीचे भाषणं मला अजिबात आवडायच नाही. कधी यांचे भाषणं संपतय आणि कार्यक्रमाला सुरुवात होते याची वाट बघायचो. एकदा कार्यक्रम सुरू झाला की धमाल. कॉलेजच पहिलंच स्नेहसंमेलन कॉलेजच्या पटांगणात होतं. कार्यक्रम मला नीट आठवत नाहीत पण फिश पौंड चा कार्यक्रम छान होता. पूर्वी कॉलेजच्या स्नेसंमेलनमध्ये फिश पौंड चे कार्यक्रम असायचे. बरेचसे फिश पौंड छान होते त्यातलं मला एकच आठवतंय. एका विद्यार्थ्याने एका सरांना लिहिलं होत.
"भाजीवाले वजनात कापतात आणि आमचे सर मार्कात कापतात" या फिश पौंड जबरदस्त टाळ्या वाजल्या होत्या......

पै काँलेजचे पहिले वर्ष.रुळायला सुरुवात झाली स्नेहसंमेलन फार मजेशीर वाटते तुम्ही त्याचा आनंद घेतला आणि स्मरणात ठेवला छान.
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteHi
ReplyDeleteDolly madamche aadnav bahutek Vaidya hote.
हो बहुतेक.
Deleteho dolly madam che nav vaidya madam amhala tya senior college la hotya. mi pan ekada tyanch vicharla madam dolly madam kuthe ahet teva tyani kahi uttar dile nahi pan lecture la baslavar kalale apan kay chuk kele te.
ReplyDeleteते खूप समंजस होत्या.
Deletemast lekh junya athvani tajya zalya
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमि नाही college ला जाऊ शकलो.
ReplyDeleteपण पेंढारकर चि मजा काही औरच होती.
भुत बंगला, १२ बंगले,५२ चाळ,व खुप काही.
धन्यवाद.
Deleteवाह ! कॉलेजच्या लीला धमाल
ReplyDeleteधन्यवाद.
Delete