क्रिकेट हा माझा आवडता खेळ. कुंदापूरपासूनच या खेळाची आवड निर्माण झाली. नारळाच्या झाडाची फांदी बॅट म्हणून वापरायचो. छोटं नारळाचं फळाला रबर लावून त्याचा चेंडू बनवायचो. तीन लाकडाचे तुकडे किंवा एखाद्या भिंतीवर खडूने तीन रेगोट्या मारून त्याला स्टंप बनवायचो. मग खेळायला सुरुवात. फलंदाजी करताना बाद झालो तरी मी नाही म्हणून चिडायचो. गोलंदाजी करताना पण चेंडू कुठेही टाकायचो. समोरच्याला बाद ठरवायचो. क्रिकेट खेळताना खूपदा पडलो, हाता-पायांना मारही लागला. घरातले ओरडायचे तुझे हे क्रिकेट खेळणे बंद कर किती जखमा झालेत? त्यावर कपडे पण फाडून येतोस. डोंबिवलीत आल्यानंतर सुद्धा मी क्रिकेट खेळणं काय सोडलं नाही. मला मजा यायची. चेंडू गटारात पडला की मीच उचलायचो घरी जाऊन हातपाय धुतले तर धुतले नाहीतर तसच जेवायला बसायचो. दिवसभर दुकान आणि क्रिकेटच्या धावपळीमुळे कधी झोप लागत होती ते कळतच नव्हतं .
लहानपणी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, गुंडप्पा, विश्वनाथ, प्रसन्ना, चंद्रशेखर या सारख्या क्रिकेटपटूंची नावं ऐकली होती. डोंबिवलीत आल्यावर मुन्नाच्या घरी रेडिओवर क्रिकेट मॅच ऐकण्याची संधी मिळाली. क्रिकेट मॅच ऐकताना गरम गरम खायलाही मिळायचं. मला अजूनही आठवतय मुन्नाच्या घरी एके दिवशी, मॅच ऐकताना भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होता, सिमसॅन गोलंदाजी करत होता, त्याच्या पायाला दुखायला लागलं होतं आणि तो अर्ध्यावर गोलंदाजी सोडून मैदानामधून निघून गेला. मला तेव्हा आश्चर्य वाटलं होतं की हा असं कसं मधूनच निघून गेला? तेव्हा काल झालेल्या मॅच च आज प्रसारण होत होतं.ते पण ऐकायला मजा यायची. रिची बॅनो कंमेंटरी करायचे. सुरुवातीला ते काय बोलायचे समजतं नसायचं. नंतर ऐकून ऐकून सवयी झाली. अभ्यास करताना सुद्धा मॅचकडे लक्ष असायच.
नुकतंच १२ मे १९८३ला मंजुनाथ शाळेसमोर आमचं दुसर दुकान "संदेश' सुरू झालं होतं. पांडुरंग अण्णा "संदेश' दुकान सांभाळायचा. कधी-कधी पुस्तके आणि इतर समान आणायला तो मुंबईला जायचा. तो मुंबईत गेला की मी "संदेश' दुकानात बसायचो. समोरच मंजुनाथ शाळा आणि कल्याण रस्त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे दुकान चांगलं चालायचं. फ्रेंड्स स्टोअर्स चा चांगला अनुभव मला होताच आणि बरेचसे गिऱ्हाईक ओळखीचे सुद्धा होते. जून महिन्यात शाळा सुरू होत असल्यामुळे दुकानात गर्दी ही असायची. जून महिन्यात इंग्लंडमध्ये क्रिकेटचं तिसरं वर्ल्डकप भरणार होतं आता पर्यंत झालेल्या दोन्ही वर्ल्डकप मालिका वेस्टइंडीसने जिंकल्या होत्या. ९ जूनपासून तिसऱ्या वर्ल्डकप सामन्याला सुरुवात झाली. आमच्या दुकानाच्यासमोर अश्वमेध सोसायटी मधला भट म्हणून एक मुलगा माझा मित्र बनला. त्याचे वडील सिंडिकेट बँकेत मॅनेजर होते. तो भारताचा सामना असला की पहिलं डाव संपलावर दुकानात येऊन मला स्कोर सांगायचा. उरलेला सामना मुन्नाच्या घरी जाऊन रेडिओ वर ऐकायचो. वेस्टइंडिस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसमोर भारताचा संघ कमकुवत होता. का माहीत नाही पण मी आशावादी होतो, हा वर्ल्डकप भारतच जिंकणार मला आधीच्या सामन्यांचे किंवा बाकीच्या संघाशी काहीच घेणं देणं नव्हतं. मला एकच माहीत होतं की आपण वर्ल्डकप जिंकणारच !!
सामन्याला सुरुवात झाली. अ आणि ब गट होत्या. प्रत्येक गटात चार संघ होते. आपण ब गटात होतो. आपल्या गटात वेस्टइंडिस,ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे संघ होते. प्रत्येक संघाबरोबर दोन सामने होणार होते. मला वाटतं भारताचा पहिला सामना वेस्टइंडिस बरोबर होता आणि तो सामना आपण ३४ धावाने जिंकलो. वेस्टइंडिस सारख्या बलाढ्य संघाला हरवल्यामुळे मी खूप खुश होतो. दुकानात येणाऱ्या गिराइकांबरोबर वर्ल्डकपची चर्चा असायची. आता दुसरा सामना झीम्बॉबे बरोबर होता आणि तो आपण सहज जिंकलो. पण तिसरा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर आपण खूप अंतराने हरलो. दुसऱ्या दिवशी मी आणि माझा मित्र दुकानात बोलत असतांना एक गिराइक ऐकत होते. ते बोलले क्रिकेट काय सोपं नाहीये पहिली स्पर्धा जिंकली नशिबाने. दुसरी टीम झीम्बॉबे साधी होती. वेस्टइंडिस,ऑस्ट्रेलिया इंग्लंडसमोर आपला संघ कमजोर आहे. जुने अनुभवी खेळाडूंना वगळून त्या कपिलला कप्तान केलाय, त्याला काय कळतंय का? वगैरे... मला खूप राग आला मी बोललो समजा हरलो तर काय बिघडलं? आपल्या देशावर आपल्याला अभिमान असायला पाहिजे, ते काय टाईमपास म्हणून तिकडे गेले नाहीत त्यांना पण सामना जिंकायचय.सर्वांनी मिळून चांगली कामगिरी केली तर हा वर्ल्डकप आपणच जिंकू. तरी ते बडबड करत होते. नंतर मी आणि मित्रांनी त्यांच्याकडे लक्ष्य दिलं नाही. चौथा सामना वेस्टइंडिस बरोबरचा आपण हरलो. तरी पण मला वर्ल्डकप जिंकण्याचा विश्वास होता!!
जेव्हा झीम्बॉबे बरोबर १७ धावांवर ५ खेळाडू बाद झाले, तेव्हा मी खूप निराश झालो. पण कपिलदेवच्या खेळीने सामनाच बदलून टाकला.त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडिस सामना असल्यामुळे आपल्या सामन्याच थेट प्रक्षेपण दाखवलं गेलं नव्हतं. कपिलदेव मुळे आपण तो सामना जिंकला.पुढचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबरचा मोठ्या अंतराने जिंकलो आणि आपण सेमी फायनलला पोचलो. सेमी फायनलचा सामना इंग्लंडबरोबर होता. इंग्लंडमध्ये इंग्लंडला हरवणं कठीण होतं. इंग्लंडने आपल्यासमोर २१७ धावांचा आवाहन उभं केलं. मोहिंदर अमरनाथ यशपाल शर्मा आणि संदीप पाटील यांच्या फलंदाजीमुळे सामना जिंकून भारत एकदाचा फायनल ला पोचला!!
२५ जून १९८३ रविवारचा दिवस होता. क्रिकेटच्या इतिहासात भारताचा सर्वात मोठा दिवस. भारताची पहिली फलंदाजी होती.वेस्टइंडिसकडे मार्शल, रॉबर्टसारखे दिग्गज फलंदाज होते. सामना जिंकण्यासाठी मोठ्या धावा अपेक्षित होत्या. मी समोरच्या मित्राची वाट बघत होतो. तो संध्याकाळी आला आणि बोलला आपले फलंदाज फक्त १८३ वर बाद झालेत वेस्टइंडिसला ६० ओव्हरमध्ये फक्त १८४ धावा बनवायचा आहेत ते सहज जिंकतील असं वाटतं. माझ्या पण मनात थोडी शंका होतीच, एवढे धावा पुरतील का? पण मी खुश होतो की आपण फायनलला पोचलो जे होईल ते बघूया. मला आपल्या भारतीय संघावर गर्व होता. दुकानात येणारे सांगत होते वेस्टइंडिसचे खेळाडू एक एक करून बाद होत आहेत. मी लवकर दुकान बंद करून घरी आलो. बाजूच्या रमेशभाईकडे क्रिकेट फायनल बघण्यासाठीच दोन दिवसांपूर्वी नवीन ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही आणला होता. भरपूर गर्दी जमली होती सर्व टाळ्या वाजवत होते वेस्टइंडिसचे सात फलंदाज बाद झाले होते. मला शेवटचे तीन खेळाडू बाद होताना बघायला मिळाले. शेवटी मोहिंदर अमरनाथ यांनी होल्डिंगला बाद केलं, आणि भारताने १९८३ चा चषक जिंकला !!! भारताच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूचा त्यात वाटा होता. मला तो शेवटचा क्षण अजून ही आठवतोय ज्वेल गार्नर आणि मायकेल होल्डिंग मैदानात बसले होते, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. पण हा खेळ आहे कोणाला एकाला जिंकायचं होतं तर त्यातला एक हरणार होता या नियमानुसार भारत जगातल्या क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये क्रिकेटचा बादशाह बनला होता.... लोकं जोर-जोरात ओरडायला लागले भारत माता की जय!!! जयाबेनने पेढे वाटायला सुरुवात केली आम्ही फटाके वाजवले, सर्वजण उत्सव साजरा करत होते.....

खेळाचे वर्णन छान केले मँच बघतो आहे. असे मस्त
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्त! त्या वेळेची उत्सुकता जीवाची घालमेल पुनः आठवणीनने अनुभवली ! छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप विस्तृत आणि रंजक वर्णन केलंय सर तुम्ही !मॕचच्या आठवणी जाग्या झाल्या
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteछान !!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसर खरच विस्तृत आणि योग्य शब्दांत केले आहे वर्णन.
ReplyDeleteअस की तो काळ डोळ्या समोरुन पुठे पुठे सरकत होता.
त्या सुमारास TV अगदी थोड्या जणांन कडे होता.
मी चंदू सोमण वगैरे हा सामना पाहण्या साठी, आताचे नेचरल आईस्क्रीम समोरच्या खोपकर वाड्यात जायचो.
मी पण अनेक ठिकाणी जायचो...
Delete