मी सातवीत असताना कुंदापूर वरून डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत कन्नड माध्यमाची शाळा नसल्यामुळे मुलुंडच्या V.P.M. कन्नड माध्यममध्ये माझं नांव नोंदवलं. तेव्हापासून मी डोंबिवलीहून मुलुंडला शाळेत जायला लागलो. सुरुवातीला एक-दोन दिवस घरातील कोणीतरी सोडायला आणि न्यायला यायचे. नंतर मात्र मी एकटाच जायला लागलो. मी आणि हरीश शेट्टी मानपाडा रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ भेटायचो. स्टेशनजवळ सामंत डेअरीच्या बाजूला एका दुकानातून हरीश लिमलेटच चॉकलेट घ्यायचा ते खात खात आम्ही स्टेशनला पोचायचो .
डोंबिवलीहून मी, हरीश शेट्टी, सीताराम प्रभू, कल्याणहून रेमंड, अंबरनाथवरून चेलुवादी तिमप्पा असे सर्वजण डोंबिवलीत दोन नंबर प्लेटफॉर्मवर अकरा दहाच्या गाडीला भेटायचो. गाडी सुरू झाल्याशिवाय आम्ही चढायचो नाही. नेहमी आम्ही सर्वजण चालती गाडी धावून पकडायचो. गाडीत गर्दी असली तर कधी कधी फर्स्ट क्लासमध्ये चढायचो. आम्ही सगळेच नेहमी दारातच उभे राहायचो. दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे प्रत्येक स्टेशनवर खाली उतरून गाडी सुरू झाली की परत चालू ट्रेनमध्ये चढायचो. ट्रेनमधल्या हँडलला लटकायचो. नेहमी स्लो ट्रेन असायची. आमच्या ट्रेनने एखादी फास्ट ट्रेनला किंवा मेलला मागे टाकल की त्या ट्रेनच्या लोकांना चिडवताना खूप मजा यायची. ट्रेन लेट असेल तर प्लॅटफॉर्म वर क्रिकेट खेळायचो. प्लास्टिकचा चेंडू, मित्रांची कोणाची तरी वही बॅट म्हणून वापरायचो. खेळताना चेंडू लोकांना लागायचा मग काय ओरडा खायाला आम्ही तयार. चेंडू खाली पडला तर उचलायला मी. शाळेत जातानाचा अर्धा तास आणि येतानाचा अर्धा तास खुप मजा असायची. ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्याची मला खूप दया यायची. त्यांचे मळके, फाटके कपडे, न धुतलेला चेहरा बघून, ते जवळ आले की आम्ही बाजूला सरकायचो. ते दोन दगड घेऊन गाणं म्हणायचे. शक्यतो एकच गाणं असायच "शिर्डीवाले साईबाबा". गाडीला गर्दी कमी असल्यामुळे फळ विकणारे, छोट्या छोट्या वस्तू विकणारे, सारखे ये-जा करायचे. आम्ही त्यांच्या आवाज काढून मष्करी करायचो. गाडीतला तो अर्धा तास कसा जायचा कळायचा पण नाही.
मुलुंड स्टेशनवरून शाळा तशी खूप लांब होती. चालत जायला कमीत कमी अर्धा तास तरी लागायचा. त्या अर्धा तासात पण आमची मस्ती असायची. मुलुंड पूर्वेला शाळेत जाताना मिठाघर रोडवर खूप चिंचेची झाडं होती. मग काय दगड मारून चिंच पडायचो. बारा चाळीसची शाळा असायची. त्या आधीच आम्ही शाळेजवळ पोचायचो. शाळा सुरू होईपर्यंत कबड्डी खेळताना हाता-पायाला मार लागायचा, पण कधीच तिकडे लक्ष्य दिलं नाही. आमच्या ग्राऊंडमधून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून मोठ-मोठ्या गाड्या वेगानं जाताना दिसायचा. शाळेच्या बाजूला केळकर कॉलेजच बांधकाम सुरू असताना आम्ही बघितलं. आधी त्याच जागेवर क्रिकेट खेळायचो, चेंडू हरवला तर सापडायचा नाही, कारण पुढे संपूर्ण दलदल होती.
मला सर्वात चांगले शिक्षक लाभले होते. त्यातल्या त्यात जवळगिरी सर, देशपांडे सर तसा मी वर्गात शांत असायचो. तिसऱ्या चौथ्या बेंचवर बसायचो. मधल्यासुट्टीत एकत्र डब्बा खाऊन, धकाबुकीं करून सरळ नळाला तोंड देऊन पाणी पिण्याची मजा काही वेगळीच. शारीरिक शिक्षण तासाला मी तर कधीच सरळ उभा राहिलो नाही. कधी ह्याला चिमटा काढ तर कधी कोणाचं शर्ट ओढ्याच, तर कोणाच्या पायावर पाय द्यायचा. पण कधी सराकडून मार खाल्ला नाही.
नववीत असताना कन्नडचा तास होता. आम्हाला कन्नड शिकवायला देशपांडे सर होते ते डोंबिवलीत राहायचे. खूप शांत प्रेमळ स्वभावाचे.आम्हा सर्वांना ते आवडायचे.अधून-मधून छान गोष्टीही सांगायचे आम्ही मन लावून ऐकायचो. एकदा देशपांडे सरांचा तास होता, माझ्या बाजूच्या मित्रांनी घरून सरानी दिलेल होमवर्क करून आणलं नव्हतं सरानी त्याला उभं केलं सर आपले कन्नड शिकवत होते तास संपायला आला सरानी बाजूच्या मित्राला समजावून सांगितलं उद्यापासून नीट होमवर्क करत जा आणि ते फळावर लिहायला वळले, मित्राला बसायला सांगितलं मी मष्करी म्हणून त्याच्या बेंच वर माझी पेन्सिल उभी धरली होती तो त्या पेन्सिलवर बसला, त्याला पेन्सिल जोरात टोचली आणि तो जोरात किंचाळला. सर्व विध्यार्थी आमच्याकडे बघायला लागले. त्याचा आवाज बाजूच्या दोन्ही वर्गात ऐकायला गेला. त्याला पेन्सिल जोरात टोचली होती. खूप दुखत होतं, त्याला रडायला आलं, रडला पण. सरानी मागे वळून पाहिल की मित्र रडत होता. सरानी आमच्या डेस्क जवळ येऊन विचारल, एवढं किंचाळयाला काय झालं? त्यांनी घडलेलं सांगितलं सरानी मला उभं केलं आणि विचारलं तू पेन्सिल ठेवली होती का? मी मान खाली घालून हो बोलताच सरानी हातानी जोरात माझ्या कानखाली वाजवली. अख्या वर्गात आवाज गुंजला. वर्गातले सर्व माझ्याकडे वळून पाहत होते. मी रडलो सराना सॉरी बोललो परत करणार नाही असं सांगितलं. मित्राला पण सॉरी बोललो. मित्राला पेन्सिलच टोक टोचल्यामुळे खूप दुखत होतं. माझ्या आयुष्यातील शाळेमधील ती खूप मोठी घटना होती. माझी चूक मला कळली. मला असं करायला नको होतं. मी मस्ती करायचो नंतर मला त्याची जाणीव व्हायची. सर खूप चांगले होते त्यांनी कधीच कोणवरही हात उचलला नव्हता, मारलं ही नव्हतं. माझ्या मस्तीमुळे पहिल्यांदा त्यांच्याकडून मी मार खाल्ला. नंतर कधी डोंबिवलीत ते मला भेटले तर ते सांगायचे माझ्याकडून मार खाल्लेला एकमेव विद्यार्थी....

पै किती खोडकर होतात.पण धीटही वाटता तरीही प्रयत्न करून पुढे आलात शालेय जीवन छान घालवल मित्रांसोबत .
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteतुमच्या प्रामाणिक पणाला सलाम.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteशाळेतल्या 'लीला' मजेशीर आहेत !
ReplyDeleteधन्यवाद.
Delete