आता लग्नाचा शुभदिवस ठरला. लग्नसोहळा म्हटलं की घरात साहजिकच आनंदाचे वारे वाहू लागले. मी शेंडेफळ. त्यामुळे घरात माझ्या पिढीतलं हे शेवटचं कार्य. परिवारात कोणाच्याही अडीअडचणीत मी मदतीला धावत असल्यानं सगळ्यांचाच लाडका! माझं लग्न थाटामाटात करायचा चंग सगळ्यांनी बांधला.
कोणी लग्नाला गावी जाण्यासाठी नवी बॅग घेतली. काहींनी नवीन ड्रेस व साडीची खरेदी केली, कोणी दाग-दागिने तर कोणी आणखी काही...एकंदरीत जोरदार तयारी चालली होती. 'आमच्यासाठी तू एकही पैसा खर्च करायचा नाही', असं त्यांनी मला बजावलं होतं. लग्न गावाला असल्यामुळे हॉलचं भाडं, जेवणाचा खर्च सर्व भावजीच बघणार होते. माझे कपडे आणि इतर सामानासाठी तयारी डोळ्यासमोर होती. मला कमीत कमी पाच /सहा हजार रुपये तरी लागणार होते.
लग्नासाठी कोणाकडून कसल्याही खर्चासाठी पैसे न घेण्याची माझीही जिद्द होती.
ही रक्कम जमा करण्यसाठी मला तीन मार्ग दिसत होते. लायब्ररी, प्लॕस्टिकची ऑर्डर आणि एल आय सी. त्यात लायब्ररीत दर महिन्याला जे पैसे यायचे, ते इतरत्र न वापरता शक्यतो नवीन पुस्तकं खरेदी करण्यासाठीच मी खर्च करत असे. लायब्ररीतून सर्व खर्च वगळून ५००/६०० रूपये मिळायचे. तर प्लॕस्टिकच्या छोट्या मोठ्या कामांतून हजारभर रुपयांची उलाढाल होत होती. राहिली एल.आय.सी. यातून मी उतरवलेल्या पॉलिसींमधून कमिशन दोन महिन्यांनी मिळत असे. या तिन्ही माध्यमांतून लग्नाच्या खर्चासाठी कसेही करून पाच ते सहा हजार रुपये उभे करायचे होते. त्यासाठी माझ्याकडे शिल्लक होते, फक्त दोन महिने !
एप्रिल महिन्यात दुकानासमोरील गुलमोहोर सोसायटीतल्या एका ओळखीत १० हजार रुपयांची पॉलिसी काढली. योगायोगानं त्यांनी मला ते काम करत असलेल्या कंपनीत बोलावलं. ती कंपनी होती, परळला. ते मोठ्या कंपन्यांचे जाहिरातीचे बोर्ड बनवायचे. तिथं बरेच कामगार काम करत असत. त्यापैकी, चार कामगारांची प्रत्येकी २० हजार रुपयांची पॉलिसी मला मिळाली. त्यासाठी खूप खटपट करायला लागली. 'मेडिकल चेकअप' साठी त्यांना डोंबिवलीत बोलावलं. स्टेशनजवळचे डॉक्टर साप्रा यांच्याकडून हे काम करून घेतलं. या कामगारांची कागदपत्रं आणि चेक घेण्यासाठी जोगेश्वरीला त्यांच्या झोपडीवजा घरी गेलो. . त्यांनी मला रात्री १० नंतर बोलावलं होतं. तिथून निघताना ११ आणि घरी यायला रात्रीचा एक वाजला. पण जिद्दीनं चारही पॉलिसी पूर्ण केल्या ! मे महिन्यात जवळपास नृऊ हजार रुपयांचे एल.आय.सी. हप्ते मी ऑफिसमध्ये जमा केले. जुलै महिन्यात मला दोन हजार रुपये कमिशन मिळालंही...
शिवप्रसाद इमारतीत आमच्या दुकानाच्या बाजूला सुखसागर दुधाची डेअरी होती. प्रमोद शानभाग हा माझा मित्र ती डेअरी सांभाळत होता. या डेअरीचं मुख्य दुकान राम नगरला शिवमंदिर रोडवर होतं. ते दरवर्षी त्यांच्या गिऱ्हाईकांना देण्यासाठी चांगल्या दर्जाच्या, त्यांचं नांव छापलेल्या प्लॕस्टिक पिशव्या बनवून भेटीदाखला द्यायचे. मित्रानं त्यांची ओळख करून दिली. मी प्लॕस्टिकचा व्यवसाय करत असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी त्यांच्याकडच्या काही पिशव्यांचे नमुने दाखवले. त्यांना त्या पिशव्या आठ रुपयांना पडत होत्या. मी अजून कमी किमतीत देऊ शकतो, असं त्यांना सूचित केलं. 'अशीच पिशवी कमी किमतीत करून देणार असाल, तर आम्हाला दोन हजार पिशव्या बनवून द्या', त्यांचा प्रस्ताव आणि लगे त्यांनी मला एक हजार रुपये अॕडव्हान्सही दिले.
मग मुंबईला जाऊन प्लॅस्टिकची चौकशी केली. काही नमुने आणले. आणलेलं प्लॕस्टिक जोडून मशीनवर सिलिंग करायला घेतलं. पण खूप प्रयत्न करूनही प्लॕस्टिक सील होत नव्हतं. मी त्यांना शब्द दिला होता, पिशव्या बनून देण्याचा आणि मला पैशांची गरज होती. हातात आलेली ऑर्डर सोडायची नाही, असा ठाम निर्धार केला.
मुंबईला ट्रेननं जात असताना कांजूर मार्ग पश्चिमेला स्टेशनजवळच एक इंडस्ट्रियल इस्टेट नेहमी दिसत असे. तिथं एखादी प्लॅस्टिकची कंपनी आहे का, याचा शोध घेण्यासाठी कांजूर मार्गला उतरून त्या इंडस्ट्रियल इस्टेटध्ये तळमजल्यावर चौकशी केली, तर त्यांनी पहिल्या मजल्यावर जायला सांगितलं. समोर अनेक कंपन्यांची नांवं होती. त्यात प्लॕस्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीचंही नांव बघून जिवात जीव आला. कंपनी दिसली, प्रवेश केला. बघतो तर माझ्याकडे जे मशीन होतं, तशा प्रकारच्या कितीतरी लहानमोठ्या मशीनवर बरेचसे कामगार काम करत होते.
आत मालकांना भेटून पिशव्यांचे नमुने दाखवले. त्यांनी त्या पिशवीचं नांव छापून सात रुपये पडतील, असं सांगितलं. त्यांना माझी अडचण सांगितली आणि कसंही करून साडेसहा रुपयांपर्यंत पिशवी बनवून द्यायचा आग्रह केला. शेवटी ते तयार झाले ! साडेसहा रुपयांना बनवून सात रुपयांना एक पिशवी विकली तर, एका पिशवीमागे आठ आणे मिळणार होते. म्हणजे दोन हजार पिशव्यांची एक हजार रुपये माझी कमाई होती!
त्यांना एक हजार रुपये अॕडव्हान्स देऊन ऑर्डर नक्की केली. त्यांनी १५ दिवसांत पिशव्या तयार ठेवतो, असं आश्वासन दिलं.
नंतर त्यांच्याकडे दोन वेळा जाऊन पिशव्यांवरचा मजकूर दिला. अजून काही पैसेही दिले. बरोबर १५ दिवसांत पिशव्या मिळाल्या! मी आणि त्यांच्या माणसांनी मिळून त्या पिशव्या दोन वेळा ट्रेननं नेऊन सुख सागर डेअरीत पोहोचवल्या. डेअरी स्टेशनजवळच असल्यानं रिक्षाचा खर्च वाचला. पिशव्या बघून सुखसागर डेअरीचे मालक खुश झाले. त्यांना एक रु. कमी किमतीत पिशव्या मिळाल्याने आणि त्यांचा दर्जाही चांगला असल्यामुळे ते खूश होते. त्यांनी लगेचच वरचे पैसे दिले. मला त्या व्यवहारात एक हजार रुपयांची कमाई झाली.
मी एप्रिलपासून खूप मेहनतीनं लग्नासाठी पैसे जमा करायला लागलो. त्याची फळं समोर दिसायला लागली. सकाळी दुकानात बसायचं, दुपारी एल.आय.सी ऑफिस, संध्याकाळी थोडावेळ दुकानात नंतर लायब्ररी, रात्री प्लॕस्टिकच्या मशीनवर बसणं. अशा अत्यंत व्यस्त कार्यक्रमात ते दिवस कापरासारखे कसे उडून गेले, ते कळलंच नाही. आपल्यासमोर एखादं सुंदर ईप्सित समोर असलं की, त्यासाठी घेत असलेले कष्टही कसे सुखद ठरतात, याचाच मी अनुभव घेत होतो. आता, हे ईप्सित कोणतं, हे काय सांगायला हवं ?
...तर एवढ्या मेहनतीनंतर एल.आय.सी.मधून ठरल्याप्रमाणे दोन हजार रु. कमिशन, प्लॕस्टिक ऑर्डरमधून एक हजार आणि लायब्ररीतून चार महिन्यांचे दोन हजार रु. असे पाच हजार रुपये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्याकडे जमा झाले ! आता लग्नाच्या खरेदीसाठी माझ्याकडे अवघे २० दिवस शिल्लक राहिले.....

पै तुमच्या जिद्दीला सलाम
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteकळले असेल कि आधी (स्वतः)हाताला चटके.कशाला म्हणतात.
ReplyDeleteथोडी गंमत, तुमच्या स्वाभिमानाला सलाम.
धन्यवाद.
Deleteखरंच कष्टाला पर्याय नाही! हे तुम्ही सिध्द करून दाखवलंत.आणि हे सगळं सुमनवैनींवरच्या प्रेमासाठी! तुसी ग्रेट हो।
ReplyDeleteप्रेम सर्व काही शिकवून जातो हेच खरं.
Deleteकेलेले कष्ट आणि मिळवलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही. 💐💐🙏🏻👍👍
ReplyDeleteखरं आहे.
Deleteप्यार सबकुछ सीखा देता है.....
ReplyDeleteएक्दम सही.
Delete