‘पुंडा, आज तुझा चेहरा असा का पडलाय ? सुमनचं पत्रं आलं नाही म्हणून ’? मी घरी आल्यावर वहिनी मला विचारीत होती. वहिनीच्या प्रश्नांनी मी अजूनच उदास झालो. मी मुंबईला आल्यावर सुमनला पत्रं लिहून बरेच दिवस झाले होते. मंगलोरहून मुंबईला येईपर्यंतची सविस्तर माहिती पत्रात लिहिली होती. गाडीत बसल्यावर माझ्या डोळ्यांतून आलेले अश्रू , कळसाच्या आठवणी, मिरजहून गाडी सुटल्यानंतर प्रत्येक स्टेशनवर उतरून बाहेर बघणं, कुठे काय खाल्लं, जेवण घेतलं, याची सविस्तर माहिती त्या पत्रात लिहिली होती. घरी पोहोचल्यावर लग्नासाठी अण्णानं दिलेल्या परवानगीचीही गोड बातमी पत्रात दिली होती. ‘मी दिलेली साडी नेसली का ? ड्रेस शिवायला दिला ? सत्यानंद सुखानंदला आपल्या प्रेमाचं कळलं का ? त्यांची काय प्रतिक्रिया ? घरातले सर्व खुश आहेत ना’? असे एक ना अनेक... असंख्य प्रश्न मी त्या पत्रातून विचारले होते. पण सुमनकडून काहीच उत्तर आलं नव्हतं. मी सुमनच्या पत्राची एखाद्या चातकासारखी आतुरतेनं वाट बघत होतो. दुकानात कसा वेळ गेला, ते कळायचं नाही. पण सुमनचं पत्रंच येत नसल्यामुळे घरी आल्यावर नाना विचारांचं काहूर मनात माजत असे. ‘ती आजारी आहे का? मी आल्यावर घरी काही समस्या?' काहीच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे नेहमी हसत खेळत राहणारा मी शांत होतो.
मी घरी आल्यावर अण्णांच्या मुलांबरोबर मस्ती, आई, वहिनीबरोबर गप्पा असा नित्याचा कार्यक्रम असे. पण माझ्या सूचक शांतपणाचं कारण वहिनीनं बरोबर हेरलं. ‘आज आपल्या पुंढाचं काहीतरी बिनसलंय का’. वहिनीनं विचारल्यावर मी होकारार्थी उत्तर दिलं. ‘मी पत्रं पाठवून बरेच दिवस झाले. पण त्या पत्राला सुमनचं अजून उत्तर आलं नाही’. ‘येईल रे. काहीतरी अडचण असेल. थोडा धीर धर’. वहिनीनं मला समजावलं. पण माझा जीव कासावीस होत होता. ते वयचं तसं होतं.
त्याकाळी मोबाईल नव्हता, धड फोनही नव्हता. फक्त पत्राद्वारे संपर्क. माझं पत्रं सुमनच्या हाती पडेपर्यंत सहा ते आठ दिवस लागत असत. वेळ काढून पत्रं लिहिण्यामध्ये एक- दोन दिवस जात होते. परत इतरांना मस्का मारून पत्रं पोष्टात टाकण्यात दोन दिवस. तिनं पाठवलेलं पत्रं नंतर चार दिवसांनी माझ्या हाती लागायचं. तोपर्यंत वाट बघून बघून माझ्या जिवात जीव नसे, दुसरं गत्यंतरच नव्हतंच. गंमत म्हणजे, दुसऱ्याच दिवशी वहिनीनं सुमनचं पत्रं आल्याची सुवार्ता दिली आणि माझं औदासीन्य क्षणात दूर झालं. पत्रं हाती पडताच मी खूप उत्साहित झालो. पत्रं वाचायला सुरुवात केली.
तिला माझं पत्रं मिळून बरेच दिवस झाले होते. मी मुंबईला निघाल्यावर तिलाही खूप रडायला आलं. पुढचे दोन- तीन दिवस दैनंदिन कामांकडे लक्ष लागत नव्हतं. खूप कामं असल्यानं माझं पत्रं येऊनही तिला लिहायला वेळ मिळाला नव्हता. तेवढ्यात ती तापानं आजारी पडली. हे वाचताच इकडे माझ्या डोळ्यांत पाणी. मी तिच्याजवळ असतो तर बरं झालं असतं, असं वाटायला लागलं. पण इलाज नव्हता. माझा व्यवसाय मुंबईत असल्यानं मी तिच्याकडे जास्त दिवस राहूच शकत नव्हतो. नंतर आमच्या नियमित पत्रव्यवहाराचा व्यवस्थित सेतू बांधला गेला...
आम्हा दोघांचं शिक्षण कन्नडमधून झालं होतं. घरी कोकणी बोलत असलो तरी, पत्रं मात्र कन्नडमधूनच लिहीत होतो. मला पत्रं लिहायची तशी सवय नव्हती. पण सुमनच्या प्रेमात पडल्यावर तीही कला मी शिकलो. दुपारी मी दुकानात लोकांची वर्दळ कमी असे. माझ्या मित्रांची टोळकी मात्र नेहमी दुपारी दुकानात मला कंपनी देत. माझ्या प्रेमप्रकरणाचं त्यांना कळल्यावर ते मला छळायला लागले. मस्करी करायचे. मी पत्रं लिहून तयार केलं की, हे मित्र ‘मैने प्यार किया’ मधलं ‘कबुतर जा जा’ हे गाणं म्हणायचे! एक बरं होतं. मी पत्र कन्नडमध्ये लिहीत असल्यामुळे त्यातला मजकूर त्यांना समजत नव्हता. मला दुकानातून बाहेर पडता येत नसल्यामुळे पत्रं पोष्टात टाकायचं काम मात्र हेच मित्र करीत असत. माझं पत्रलेखन सुरू असताना कोणी गिर्हाईक आले तर हेच मित्र मदत करायचे. एकंदरीत दुपारचा वेळ सुमनला पत्र लिहिण्यात ‘सत्कारणी’ लागत होता !
पत्रं लिहिणं, ही एक कला आहे. मी पत्रं लिहिण्याचं कारण म्हणजे, त्या निमित्तानं मला सतत सुमनच्या संपर्कात रहायचं होतं. रोज घडणाऱ्या गोष्टी तिला सांगायच्या होत्या आणि तेव्हा पत्रं हे एकच साधन असल्यामुळे दिवसभर कामं असूनही वेळ काढून भरपूर विचार करून पत्रं लिहीत असे. एकदा पत्रं लिहायला सुरुवात केली की मन त्या पत्रात गुंतत होतं. सुमन माझ्यासमोरच असून तिच्याशी मी थेट संवाद साधतोय, अशी रम्य कल्पना करून त्या दिशेनं पत्रातल्या लिखाणाचा मूड मी बरोबर पकडत असे. चित्रपटातला नायक नायिकेला पत्र लिहितोय, नायिकेचा चेहरा त्याला समोर दिसतोय...पत्रं लिहिताना अगदी तशाच सुखद भावनांचा आवेग मनात उसळत असे. मनमोकळेपणानं पत्रं लिहून मी रोजच्या लहानमोठ्या गोष्टी त्यात मांडत होतो. पत्रं लिहून पाठवलं की बरं वाटायचं. ते लिहिताना दरवेळी मला काही नवनवीन कल्पना सुचत होत्या.
आमच्या लग्नाची तारीख अजून ठरली नव्हती. एक फेब्रुवारीपासून दर आठवड्याला कमीत कमी तीन पत्रं पाठवायचं ठरवलं. पत्रांची कल्पना मात्र भन्नाट होती. एक पत्रं अगदी छोटं म्हणजे पोष्टाच्या स्टॅम्पवर काही शब्द लिहून पाठवलं. तर एक पत्र काहीच न लिहिता अगदी कोरं पाठवलं. दुकानात ड्रॉईंग पेपर होता. तोच एकदा आख्खा लिहून मोठ्या इन्व्हलपद्वारे पाठवला. तर छोटे छोटे पेपर चिकटवून दोन मीटरचा पेपर तयार केला. एकही जागा रिकामी न ठेवता छानसं पत्र तयार केलं. अधून मधून वेगवेगळ्या विषयांची ग्रीटिंग्जही पाठवली.
तेव्हा दिलीपकुमार आणि राजकुमारचा ‘सौदागर’ चित्रपट गाजत होता. त्यातलं ‘I.L.U. I.L.U’. हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. त्याचं पोस्टर आणि ग्रीटिंग्ज बाजारात नुकतीच आली. ती मी सुमनला पाठवली ! तिलाही खूप आवडली. तिनं तिच्या पत्रातून तसं कळवलंही. मला इंग्रजी जमत नव्हतं. तरीही एक पत्रं फक्त इंग्रजीमध्ये लिहिलं. एकंदरीत वेगवेगळ्या शंभरभर पत्रांचा वर्षावच केला, म्हणायला हरकत नाही. वेळ मिळाल्यावर सुमनही मला निरनिराळी पत्रं पाठवत असे.
आई, वहिनी चिडवायच्या, ‘एवढी पत्रं तू लिहितोस. त्यात विषय काय असतात? रोज रोज काय लिहितोस, आम्हालाही कळू दे की जरा’!. ताई, प्रेमाक्का सर्वांना आमच्या प्रेमाचं समजलं. आम्ही लग्न करतोय, हे कळल्यावर त्या खुश झाल्या. त्यांनाही आमच्या पत्रसंवादाचं कौतुक वाटायचं. एखाद्या कार्यक्रमाला आमचे नातेवाईक जमले की, चर्चा आमच्याबद्दल ! त्याच्यांसमोर मी लाजत असलो तरी, सुमनच्या आठवणींनी मनावरून मोरपीस फिरल्याचा भास होत असे. मला आमच्या प्रेमाबद्दल कोणी बोललेलं खूप आवडत होतं. मी सुमनबरोबर घालवलेले दिवस आठवायचे. सारखी तिची आठवण यायची. कधी एकदा लग्नाची तारीख ठरते, लग्न होऊन सुमन कधी माझ्याबरोबर रहायला येते, या इच्छेनं मी अधीर झालो. त्याची दुसरी बाजू म्हणजे, लग्न लांबणीवर गेलं तर तेवढी जास्त पत्रं तिला लिहिता येतील. एकदा लग्न झालं की मग पत्रं कोणाला लिहायची, असंही वाटत असे. सुमनच्या पत्रांची वाट कशी बघणार ? जी मजा वाट बघण्यात असते, त्यापासून मी वंचित राहिलो असतो. पत्रं लिहिण्यात आणि सुमनच्या पत्रांची वाट बघण्यातल्या त्या सोनेरी दिवसांच्या रम्य आठवणी आजही मनावर तितक्याच ताज्या आहेत. ते दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस होते......

पत्रलेखन कला भन्नाट च होती छान बरे वाटते वाचायला
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteछान लिखाण
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteचला,प्रेम करायला लागल्या पासून नवी गणिते जमायला लागली. हे बरे झाले,
ReplyDeleteअसो पत्र लेखन हि एक कला आहे.
अशीच पत्र लिहा व आम्हांला वाचयला पाठवा.
तुमची लिखाणाची दाद देतो.
जरूर पाठवणार.
Deleteहे वाचून सगळ्यांनाच आपले इलू इलू चे दिवस आठवले असतील
ReplyDeleteहो बरोबर सांगितलं
Delete