कुठलाही व्यवसाय म्हटलं की नफा तोटा असतोच. जोखीम जिथे जास्त असते तिथे नफा जास्त, जोखीम जिथे कमी तिथे नफा पण कमी असतो.हा कुठल्याही व्यवसायाचा नियम.मी वाचनालयाचा व्यवसाय निवडला. जिथे जोखीम कमी त्याबरोबर नफाही कमी होता.मला वाटलेलं की वाचनालय चालवणं खूप सोपं काही पुस्तके ठेवायची, एक स्टाफ नेमायचा की लगेच सभासद यायला सुरुवात होतील. मला स्वतःला काही करावं लागणार नाही. कालांतराने मला समजलं की लायब्ररीत मला स्वतःला वेळ द्यावा लागेल. सुरुवातीला मी लायब्ररीकडे जास्त लक्ष्य दिलं नव्हतं. बँकेतून कर्ज घेतल्यावर हप्ते भरावे लागणार होते. आता मात्र लायब्ररीकडे लक्ष देणे गरजेचे होतं. नवीन दर्जेदार पुस्तक मागावल्यामुळे सभासदांची संख्या वाढत होती. जसे सभासद वाढायला लागले तसे तसे समस्या पण वाढत होत्या.
डोंबिवलीतल्या काही वाचनालयात बरेचसे नियम व अटी असायच्या. एका वेळेस एकच पुस्तक वाचायला घेऊन जाता येईल, एका दिवसातून एकदाच पुस्तक बदलून दिलं जाईल, पुस्तक आठ दिवसापेक्षा जास्त काळ राहिले तर दिवसाचे विलंब शुल्क भरावे लागेल, जास्त किंमतीचे पुस्तक असेल तर अनामत रक्कम जमा करावे लागेल, पुस्तक हरवलं तर पुस्तकाची मूळ किंमत भरावी लागेल, पुस्तके वाचनालयात जास्ती वेळ चाळत बसायचं नाही असे बरेचसे नियम व अटी होत्या. काही वाचनालयात नियम व अटीचे रबर स्टॅम्प बनवून प्रत्येक पुस्तकाच्या मागे त्याचे ठसे मारले होते तर काही वाचनालयात नियम व अटींचे बोर्ड लावलेले असायचे. मी फ्रेंड्स लायब्ररीत कमीत कमी नियम लागू केले त्यामुळे काही काळाने लायब्ररीत काही समस्या निर्माण होऊ लागल्या. वाचक पुस्तकातल्या पानांवर लिहून आणायचे तर काही वाचक पुस्तकातील मधली पान फाडून आणायचे. नेमकं रेसिपींची पाने फडलेली असायची. कधी कधी चुकून दुसऱ्या वाचनालयाची पुस्तके आमच्याकडे घेऊन यायचे. तर कधी पावसाळ्यात सभासद पुस्तके भिजवून आणायचे. विलंब शुल्क नसल्याने सभासद काही पुस्तकं महिनाभर ठेवून घ्यायचे. घरातले सर्वजण व शेजारचे सर्व जणांनी पुस्तक वाचून झाले की परत करायचे. काही सभासद दुकाना पासून मला ओळखत असल्यामुळे एका वेळेस दोन दोन पुस्तके घेऊन जायचे वर्गणी मात्र एकाच पुस्तकाचे भरायचे.त्यात काही मित्रही होते. माझा वाचनालायकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच होता!!!
आपल्या लायब्ररीत कथा, कादंबऱ्या होत्याच त्याच बरोबरीने कॉलेजची पुस्तकेही मी ठेवली होती. कॉमर्स आणि सायन्सची पुस्तके होती. कॉमर्स साठी बरेच सभासद होते. महिन्याचे फक्त वीस रुपये भरून बरीचशी पुस्तके त्यांना वाचायला मिळत होती. मध्यंतरी माझ्याकडे लता म्हणून जी स्टाफ कामाला होती ती सर्व सभासदांशी संवाद साधायची त्यामुळे सर्वांशी चांगले नाते जुळले होते. कॉलेजची मुलं मात्र जास्त मस्ती करायचे. त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवायला लागायचं. लता आलेली पुस्तके अधून मधून चाळून बघायची. एकदा अकरावीच्या नवनीत प्रकाशनाचे eco च पुस्तक चाळताना मधली काही पानं काढून दुमडून परत चिटकवून आणलेली आढळून आले. लताने ते पुस्तक माझ्या निदर्शनास आणले.मग आम्ही ते पुस्तक कोणी कोणी नेलं ते तपासायला सुरुवात केली. सुरुवाती पासूनच आमच्याकडे प्रत्येक सभासदांचे एक फॉर्म भरून फाईलला लावलेलं असायचा. प्रत्येक सभासदाने कोणत्या तारिखेला कोणतं पुस्तक नेलं आणि कोणतं पुस्तक परत केलं हे लिहलेलं असायचं. आम्ही सर्व अकरावीच्या सभासदांची नावं शोधून काढली त्यांचा नंबर काढून ते पुस्तक कोणी नेलं? कधी नेलं? आणि कधी परत केलं? हे सर्व शोधलं. ते पुस्तक शेवटी कोणी नेलं हे आम्हाला कळलं. त्यांनी ह्याच्या आधी कुठली पुस्तके नेली ते पण शोधलं. त्याच्या नावावरचे सर्व पुस्तके शोधली. आणि बघितलं तर अजून दोन पुस्तके O.C. आणि S.P. ची पुस्तके ही अशीच मध्ये फाडून चिकटवली होती. त्याच्या बरोबर अजून दोन मित्र पण होते दोघांचे खाते तपासले तर त्यांनी पण तीच पुस्तके नेली अस आमच्या निदर्शनास आलं. तिघांनाही मी लायब्ररीत बोलवलं. विचारपूस केली तर कोणीही पुस्तक फडलेलं कबुल करायला तयार नव्हत. तिघे ही एकमेकांवर ढकलत होते. शेवटी मी ठरवलं त्यांच्या घरच्यांना भेटायच घडलेलं त्यांना समजावून सांगायचं. मला पुस्तक फडलेल्याच काहीच नव्हतं पण मुलं शाळेत कॉपी करून पेपर देतात याच खूप वाईट वाट होतं. ती मुलं जे काही करीत आहेत ते चुकीचं आहे त्यांनी या पुढे असं करू नये असं मला वाटत होतं. मी शाळेत, कॉलेजमध्ये असताना खूप मस्ती केली पण कधी परीक्षेत नक्कल केली नव्हती. कधीच असा प्रकार केला नव्हता. अभ्यास करून सरळ मार्गाने जे गुण मिळतील तेवढ्यातच समाधान मानायचो. नक्कल करून गुण मिळवून काहीच उपयोग नाही असं माझं ठाम मत होतं. या मुलांच्या घरी कसं जायचं? काय सांगायचं? असे प्रश्न होते. तिघांच्याही पत्ता लिहून घेतला. सर्व टिळकनगरमध्ये राहणारे होते. पहिल्या मुलाच्या घरी गेलो, फ्रेंड्स लायब्ररीतून आल्याचं सांगितलं. त्यांनी बसायला सांगितलं. ते अण्णांच्या ओळखीचे होते. फ्रेंड्स स्टोअर्समुळे ओळख झाली होती. मुलगा वर्गणी वेळेवर भरतोना पुस्तक वेळेवर देतोना लायब्ररीत मग कशी? काय चालाय? वगैरे विचारपूस केली. मुलगा समोरच बसला होता. मला बघून खूप घाबरला होता. जाताना तिन्ही पुस्तके मी बरोबर घेतली होती. त्याच्या घरच्यांना ती पुस्तके दाखवली आणि जे घडलं ते सांगितले. घरच्या लोकांसमोर त्याने कबूल केल की परत असं करणार नाही. त्याने घरच्यांची आणि माझी माफी मागितली. मग मी तिकडून दुसऱ्याच्या घरी गेलो ते माझे ओळखीचे निघाले त्यांनी मल बसायला सांगितलं. परिचयाचे असल्या कारणाने मला चहाही दिला. त्यांनी मला येण्याचे कारण विचारलं. मग मी ती पुस्तके त्यांना दाखवली आणि सविस्तर माहिती दिली त्यांनी सर्व नीट ऐकून घेतलं. तो मुलगा आतमध्ये अभ्यास करत होता त्याला बाहेर बोलवून घेतलं. त्यांना खूप राग ही आला होता ते सरळ त्याला मारायला उठले मी कसंबसं त्यांची समजूत घातली. मुलांनी ही पुस्तके फाडल्याचे काबुल केले. त्याच्या घरच्यांनी यापुढे असं घडून देणार नाही आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ असे सांगितल्यावर मी तिकडून निघालो. नंतर तिसऱ्याच्या घरी गेलो त्यांनी मात्र मला आत सुद्धा घेतलं नाही आमचा मुलगा असं काही करणार नाही हे सर्व त्याचे मित्रांचे कामं असतील उगाच याला अडकवू नका वगैरे बोलले. मी माझं काम केलं होतं. पुढचं भविष्य त्यांच्या हातात होत. माझ्या या एका निर्णयामुळे ते तिन्ही मुलं पुढे शिकून खूप मोठया पदावर पोचले. त्यातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर बनून अमेरिकेत सेटल झालाय. दुसरा बंगलोरला जॉब करतोय तर तिसरा स्वतःचा व्यवसाय सुरू करून मुंबईला राहायला गेलाय. आज सुद्दा ते माझी आठवण काढतात, डोंबिवलीत आले तर मला लायब्ररीत येऊन भेटतात....

योग्य वेळी मुलांना समज दिली हे खूप छान काम केले मुलांचे भविष्यात फायदा झाला
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteलायब्ररी सारख्या व्यवसायात असा अनुभव येणं खूप वेगळं आहे आणि तुम्ही सामाजिक भान ठेवून जे केलंत ते कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteपै सर ,एक अवघड पण अत्यावश्यक जबाबदारी निभावलीत तुम्ही! खरंंच सामाजिक भान तुमच्या रक्तातच असणार!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसर तुमच्या कामाचे अभिनंदन,
ReplyDeleteमुलाना वळण पण लावले.
धन्यवाद.
Delete