...आणि प्रवासाचा थकवा विसरलो !
संध्याकाळी सहाच्या दरम्यान मी सुमनच्या घरी पोहोचलो असेन. घरात सुमनची आई म्हणजेच माझी मोठी बहीण इंदिरा अक्का, जिजाजी (ज्यांना आम्ही भावजी म्हणत असू.) आणि सुमनचे दोन लहान भाऊ सुखानंद, सत्यानंद असे पाचजण रहात होते. सुमनची मोठी बहीण प्रतिमा ही लग्न होऊन मंगलोरला रहायला होती. पोस्ट कामामुळे काही काळ ती इकडेच असायची. मोठा भाऊ प्रेमानंद कामानिमित्त मुंबईला रहात होता. तोही नुकताच विवाहबद्ध झालेला.
त्या दिवशी मला अचानक आलेला बघून इंदिरा अक्काला सुखद धक्का बसला ! तिनं मला बेडरूममध्ये नेलं. पाणी आणून दिलं. बेडरूम खूप छोटी. तिथं फक्त एक पलंग आणि दोन कपाटं. तिथंच पलंगावर बसलो. बाजूला छोटीशी खिडकी. खिडकीतून वेगवेगळ्या फुलांची झाडं दिसत होती. माझी नजर मात्र सुमनच्या आगमनाकडे खिळली होती. सुमन आता येईल कधी ? कधी तिला एकदाचा बघतो,असं झालं होतं. एवढ्या लांबून प्रवास करून फक्त सुमनसाठीच मी आलो होतो. अक्काला हळूच विचारलं, ' बाकीचे कुठे आहेत'? पण मला फक्त सुमन कुठे आहे, हेच जाणून घ्यायचं होतं. पण अक्काला थेट विचारण्याचं धाडस होत नव्हतं ! अक्का म्हणाली, 'भावजी मार्केटला गेलेत, सुखानंद आणि सत्यानंद बागेत काम करताहेत. सुमन मागेच आहे आता येईलच'. तेवढ्यात पैंजणांचा आवाज ऐकू आला आणि माझ्या हृदयाचा ठोकाच जणू चुकला ! अक्काबरोबर बोलत असलो तरी माझं लक्ष दाराकडेच होतं. माझी खात्री होती, सुमनच आली असेल. मी येत असल्याचं तिला पत्रात लिहिलं होतं. पण कधी येणार, हे मात्र सांगितलं नव्हतं. त्यामुळे मला अचानक समोर बघून सुमन गोंधळली आणि हसलीही. तसं ती नेहमीच हसत असे. पण आज तिचं हसणं काहीसं वेगळं, सूचकही होतं. मी आल्याचा अस्फुट आनंद त्या हसण्यामध्ये प्रतिबिंबित झाला होता. तिच्या त्या हसण्यामागे मला वेगळ्याच हळुवार भावना जाणवल्या, माझ्यावरचं प्रेम तिच्या डोळ्यांत दिसत होतं. मीही हसलो. काही क्षण तिच्याकडेच एकटक बघत राहिलो. आता काय बोलायचं, हेच मला सुचत नव्हतं. सुमनही काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती. तीही गोंधळली होतीच.
तेवढ्यात अक्कानं हाक मारली आणि मी जरा भानावर आलो. 'पाणी गरम आहे अंघोळ करत असशील तर'... अक्काच्या बोलण्यावरून एकदम दचकलो आणि 'हो अंघोळ करायला जातो' , असं काहीसं पुटपुटलो. सुमननं टॉवेल आणून दिले आणि मला बाथरूमपर्यंत सोडलं. बाहेर खूप थंडी होती. एक बरं होतं. अंघोळीसाठी गरम पाणी होतं. आम्ही बाथरूमला कोकणीमध्ये 'न्हाणी' म्हणतो. तिकडे केळीचा घड लोंबकळत ठेवला होता. त्यातली काही केळी पिकली होती. मला खूप भूक लागलेली. अंघोळ करता करता त्यातलीच दोन पिकलेली केळी खाल्ली !
अंघोळ करून बाहेर आलो. दिवसभराच्या प्रवासामुळे अंग दुखत होतं. गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर अंग दुखणं कमी झालं. कपडे बदलून बाहेर येताच अक्कानं नाश्ता तयार ठेवला होता. नंतर तिनं मोठ्या ग्लासात गरमागरम कॉफी दिली. अशा थंडीत गरम कॉफी पिण्याचा आनंद वेगळाच. सात वाजायला आले असतील. बाहेर अंधार पडला होता. मी सुमनच्याच शोधात होतो. ती देवघरात होती. रोज संध्याकाळी देवघरात सुमन किंवा अक्का देवाची भजनं म्हणत असत. सुमन देवघरात भजनं म्हणत होती. मीही तिच्या बाजूला जाऊन बसलो. आजपर्यंत कधी भजन म्हटलं नव्हतं. लहानपणी देवळात जात होतो, तेव्हा सगळी भजनं पाठ होती. आमच्याकडे जास्त करून भजनं मराठीतच असायची. थोडीफार कन्नडमधली. 'अमृताहूनी गोड, नाम तुझे देवा', 'केशवा माधवा', 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' अशी नेहमीची भजनं गायली जात असत.
भजनं संपल्यावर आम्ही देवघरातून बाहेर पडलो. अक्का ताक घुसळून लोणी काढत होती. घरीच तीन चार गायी होत्या. त्यामुळे दूध भरपूर. लोणीही पुष्कळ येत असे. मला लोणी खूप आवडायचं. एवढं लोणी बघून मी मात्र खूप खुश होतो. चार पाच दिवस मला भरपूर लोणी खायला मिळणार होतं ! इतक्यात भावजी मार्केटहून परतले. त्यांनाही मला अचानक आलेला बघून आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, 'एकटाच आलास की अजून कोणी आलंय बरोबर' ?मी एकटाच काही दिवस फिरायला आल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'बरं झालं, तसं तू कधी बाहेर पडत नाहीस. कामं नेहमीचीच असतात. असं अधून मधून बाहेर पडत जा'. तेवढ्यात सुखानंद आणि सत्यानंदही आले. दोघेही मला बघून हसले. 'कधी निघालास, काही काम काढलं का, असंच फिरायला आलास ? असं त्यांनी विचारलं. मी सहज फिरायला आल्याचं सांगितलं.
आतापर्यंत कोणालाच पत्ता लागला नव्हता, मी कशासाठी आलो ते ! मी मनातल्या मनात खूश होतो आणि एकीकडे सुमनलाही शोधत होतो. ती जेवणाच्या तयारीला लागली होती. मीही स्वयंपाक घरात शिरलो. तिकडे अक्काही होती. माझं सुमनच्या कामाकडे लक्ष होतं. आता मला खूप थंडी वाजायला लागली. हे कळल्यावर सुमननं आतून ग्रे कलरचा लांब हातांचा छानसा स्वेटर आणून दिला. मी तो स्वेटर घातला आणि थोडंसं गरम पाणी प्यायलो. आता मला बरं वाटायला लागलं. त्यांच्याकडे रात्री आठ-साडेआठ पर्यंत जेवणं होत असत. त्यादिवशी मी, भावजी, सुमनचे दोघे भाऊ आदी जेवायला बसलो. गप्पा मारता मारता जेवण उरकलं. आचा फक्त अक्का आणि सुमन जेवायच्या राहिल्या होत्या. त्यांचं जेवण होईपर्यंत मी स्वयंपाक घरातच चिकटून राहिलो.
दोघींचं जेवण झाल्यावर सुमन भांडी घासायला बाहेर पडली. मीही तिच्या मागे. बाहेर खूप अंधार होता त्याचबरोबर शांतताही पसरली होती. सर्व बाजूंनी झाडी होती. किड्यांच्या आवाज ऐकू येत होता. आजूबाजूला अंधारच असल्यामुळे आकाशात तारे स्पष्ट दिसत होते. अशा मोहक वातावरणात एकीकडे समोर मुग्ध सुमन आणि त्याचवेळी चंद्र ढगांतून अधून मधून बाहेर पडत होता. अतिशय छान वाटत होतं. सुमनच्या तेवढ्याही थोड्या सहवासात दिवसभरातल्या प्रवासाचा थकवा विसरलो !
अक्काकडे आल्यापासून मी आणि सुमन तसे एकत्र होतो. तरीही, माझं आणि सुमनचं जास्त बोलणं झालं नव्हतं. फक्त एकमेकांना बघून हसण्यावरच समाधान मानावं लागत होतं... रात्रीचे नऊ वाजले असतील. सुमननं माझं अंथरुण तयार केलं. खूप थंडी असल्यामुळे मला दोन साध्या चादरी आणि एक जाड चादर दिली. तहान लागली तर एक तांब्या पाणी. रात्री बाथरूमला जायचं असेल तर टॉर्च दिला. मी, सुखानंद, सत्यानंद एका खोलीत, अक्का आणि भावजी बेडरूममध्ये आणि सुमन तिच्या स्वतंत्र खोलीत झोपली. त्यांच्याकडे कुठल्याही खोलीत पंखा नव्हता. बाहेर थोडासा आवाज आला तरी मला आत ऐकायला येत होता. दिवसभराच्या प्रवासात थकल्यामुळे कधी झोप लागली, कळलंच नाही. खूप थंडी असल्यानं रात्री 12 च्या सुमारास जाग आली. बाथरूमला जायचं होतं. टॉर्च घेऊन दार उघडलं. पण बाहेर जायची भीती वाटत होती. खूप अंधार होता. तेवढ्यात अक्काला जाग आली. तिनं बाहेरचे दिवे लावून दिले. घाबरत घाबरत बाथरूमला जाऊन आलो आणि तीन पांघरूणं घेऊन परत आडवा झालो. 'आता उद्यापासून सुमनला निवांतपणे कसं भेटायचं', याचाच एकमात्र विचार करत असताना केव्हा झोप लागली, हेही कळलं नाही !

भावजी आणि इंदिरा अक्का

कळसामधील देवघर

प्रेम म्हणजे तुला भेटणं,प्रेम म्हणजे तुझं हसणं
ReplyDeleteअसं हे प्रेम खूप सुंदर व्यक्त झालंय सर
आता लग्नासाठी परवानगी मिळवणं कसं काय जमवलंत वाचायची उत्सुकता वाढलीय.
त्या साठी अजून थोडं थांबावं लागेल
Deleteनलिनी पाटील
ReplyDeleteपै काका,
उंचीवर असलेल्या आणि त्या झाडाच्या शेंड्यावर असलेल्या फुलासाठी एवढे कष्ट घेणे भागच आहे.
प्रेमासाठी सखे ग झालो भुकेला! पण या आठवणी आयुष्यभरासाठी जपून ठेवण्यात खूप आनंद असतो.
खरा बोललात
Deleteवाह काका, कसली भारी स्टोरी आहे तुमची
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteक्या बात है सर! मस्तच लिहित आहात!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteक्या बात है सर! मस्तच लिहित आहात!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखुप छान प्रेम वर्णन
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteपै फारच छान सुमन च्या भेटीची उत्सकता मन गुंतवण फारच सुंदर थोडक्यात काय गुंतता ह्रदय हे पुढे सांगा लवकर
ReplyDeleteनक्कीच
Deleteपै सर तुमचे ह्रदय गुंतता हे असे झाले. पुढे लवकर सांगा काय ते
ReplyDeleteजरूर कळवतो
Deleteभारी वाटतंय वाचताना
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteअंघोळ करताना केळी खाणे लै भारी होतं !!
ReplyDeleteतो एक वेगळाच अनुभव होता.
Delete