रस्त्यावर बरेचसे घटना घडत असतात. कधी अपघात होत असतो कधी लोक चक्कर येऊन पडतात तर कधी पाय घसरून पडतात. चोर मंगळसूत्र ओढून पळून जातो तर कधी कोणाची चावी हरवते, सायकली वरून किंवा गाडी वरून माणसं पडत असतात, तर कधी लोकांना सुट्टे पैशांसाठी भटकायला लागतं. हे सर्व नेहमी घडत असतं. या घटना घडत असताना जास्त करून आजूबाजूचे लोक मदतीला येतात पण कधी कधी समोरचे दुकानदार सुद्धा मदतीला येतात. चक्कर आली तर त्यांना दुकानात घेऊन जाऊन पाणी पाजतात, बसायला टेबल देतात. जखम झाली असेल तर डॉक्टरकडे जायला सांगतात. चोर चोरी करून पळत असेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. पैसे सुट्टे करून देतात चावी शोधायला मदत करता. कोणी रस्त्यावर पडलेली चावी दुकानात आणून दिली तर त्या हरवलेल्या माणसापर्यंत पोचवण्याची जबाबदारी दुकानदार घेत असतात. दुसऱ्यांच्या मदतीला धावणे ह्यालाच तर माणुसकी म्हणतात.
आमचं "फ्रेंड्स स्टोअर्स" दुकान डोंबिवलीतल्या हार्ट ऑफ द सिटी म्हणजे टिळकनगरमध्ये होतं. टिळक नगरमध्ये आत येताना गोविंदाश्रम हॉटेल त्याच्या समोर फडके वॉच सेंटर, आत वळलो की डॉक्टर राजेंद्रप्रसाद रोड, बाजूला मानव कल्याण केंद्र आमच्या दुकानावरून थोड पुढे चालत गेलो की टिळकनगर पोस्ट ऑफिस, समोरच टिळकनगर विद्यामंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि मधोमध आमचं दुकान. बरेचसे घटना आमच्या दुकानाच्या समोर घडताना मी पहिल्या. जरी दुकानात गिऱ्हाईक असले तरी थोडाफार माझं लक्ष बाहेर असायचं. काही घटना घडल्या किंवा वेगळा प्रकार घडला की मदतीला मी हजर!!
एके दिवशी संध्याकाळचे चार पाच वाजले असतील. मी आणि दुकानातले दोघे कामगार दुकानात साफ सफाई करत होतो. पोस्ट ऑफिसच्या बाजूने एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन चार रस्त्याकडे जात होते. त्यांनी आपल्या मुलाला समोर बसवला होत. बरोबर आमच्या दुकाना समोरून जात असताना समोर बसलेला मुलगा जोरजोराने ओरडायला लागला. त्याचा वडीलांनी सायकल जागच्या जागी थांबवली. मुलगा समोर बसल्याने त्यांना सायकल वरून खाली उतरता येत नव्हतं. मी दुकानातून हे सर्व बघत होतो. वेळ न घालवता आमच्या दुकानाच्या टेबल वरून उडी मारली आणि त्यांच्याकडे धावत सुटलो. जवळ जाऊन बघतो तर त्या मुलाचे पाय सायकलच्या समोरच्या चाकेत अडकले होते आणि रक्त येत होतं. मी त्यांना म्हटलं समोरच्या टायर चे स्पोक तोडायला लागतील चाक पुढे मागे होत नव्हते. त्याच्या वडिलांना काहीच सुचत नव्हतं. मी पटकन दुकानात गेलो हातोडी आणि पक्कड घेऊन आलो. लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. मी गर्दी बाजूला सरकावून सायकल गाठली. पक्कडने टायरच्या दोन तीन स्पोक्स तोडल्या आणि त्याचा पाय बाहेर काढला. मुलाला उचलून दुकानामध्ये घेऊन आलो. दुकानात आजूबाजूचे दुकानदार जमले. त्याच्या बोटांना जखमा झाल्या होत्या. त्याला टेबलवर बसवलं. दुकानातल्या चॉकलेटच्या भरणीतून एक लॉलीपॉप काढून त्याच्या हातात देताच त्याचं जखमेकडे दुर्लक्ष झालं!! लॉलीपॉप हातात देताच मुलगा हसायला लागला. त्याच्या वडिलांना शेजारच्या दुकानदारांनी पाणी पाजलं. थोडं बरं वाटल्यावर दोघे सायकली वरून घरी गेले. मला एक चांगलं काम केल्याच मनाला समाधान वाटलं.
सकाळी साडेसहाच्या सुमारास मी दुकान उघडायचो. दुकानात सामान पुष्कळ असल्याने ते सर्व बाहेर लावून ठेवेपर्यंत आठ वाजायचे. दुकान उघडल्यापासूनच गिऱ्हाईक सुरू असायचे. सकाळी शाळेत जाणारी मुलं आणि त्यांचे पालक काही न काही वस्तू घ्यायला दुकानात यायचे. या दरम्यान कसे नऊ वाजयचे कळायचंच नाही. बरोबर नऊ वाजता अण्णा घरून निघून पाच मिनिटात दुकानात यायचे. आमचं तसं जास्त बोलणं होत नव्हतं. कामा पुरतेच बोलायचो आम्ही. मी घरी जाऊन अंघोळ आणि नास्ता करून होईपर्यंत दहा वाजयचे. आई छान इडली, डोसा बनवायची. इडली,डोसा बरोबर चटणी पेक्षा मला लोणी जास्त लागायच. लोणी असेल तर मी दोन इडली जास्त खायचो!! नास्ता उरकला की परत दुकानात जायला तयार.
असेच एक दिवस मी नास्ता करून दुकानात गेलो. अण्णांना बाहेर जायचं होतं. अण्णा मला सर्व समजावून सांगून निघून गेले. दुकानात मी आणि दोघे कर्मचारी होतो. दुकानाच्या समोरून काही लोकं डावीकडे पळत जाताना मी बघितलं. पटकन मी दुकानाच्या बाहेर पडलो. मी पण त्या दिशेने धावलो. आमच्या इमारतीच्या बाजूला गटारात गायीचं वासरू अडकलं होतं. वासरू मोठं आणि खूप जाड होतं. तेव्हा गटारे सर्व उघडी असायची. वासरू कसं पडलं समजलं नव्हतं. त्याचे चारही पाय वरती होते. त्याच पोट गटारात दोन्ही बाजूने अडकलं होतं. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गर्दी केली होती. कोण वासरुला पाणी पाजत होतं तर कोण पाय पकडून बाहेर खेचायचे प्रयत्न करत होते. वासरू पायाला हात लावून देत नव्हतं. ते खूप घाबरल होतं. वासरूला बाहेर काढायचा आम्ही खूप प्रयत्न केला. आम्हाला काय करायचं सुचत नव्हतं. इतक्यात रस्त्यावरची गर्दी बघून रिक्षावरून जाणारे दोन सरदारजी रिक्षातून खाली उतरले. त्यांनी वासरू गटारात अडकलेलं पाहिलं. रिक्षावाल्याला पैसे देऊन जायला सांगितल. दोघे सरदारजी सहा फूट उंच असतील दिसायला धीपाड होते. ते आमच्याजवळ आले आणि मोठी रस्सी मागवायला सांगितली. मी माझ्या माणसाकडे पैसे देऊन नवीन जाड रस्सी आणायला सांगितलं. थोड्याच वेळात रस्सी आली सरदारजीने त्या रस्सीचे दोन तुकडे केले दोघांनी मिळून एक रस्सीचा तुकडा वासरूच्या मानेच्या इकडे आणि दुसरा तुकडा पोटाच्या आतून दुसऱ्या बाजूला ओढून घेतला. वासरू सारख ओरडत होतं. पाय झटकत होतं. दोघे सरदार मजबूत होते. त्यांचा उंचीचा त्यांनी फायदा घेतला. एक सरदारजी गटारात उतरला. आम्हा सर्वांना त्यांनी रस्सी खेचायला सांगितले. खाली उतरलेला सरदारने दोन्ही हातानी वासरूला उचलले आम्ही सर्वांनी रस्सी ओढून वासरूला गटारातून बाहेर काढले. वासरू बरेच वेळ गटारात अडकून पडल्यामूळे पोटाच्या दोन्ही बाजूला खरचटल होतं. जसं त्याला आम्ही बाहेर काढताच लंगडत लंगडत ते वासरू पळून गेलं. आम्ही सर्वांनी त्या दोन्ही सरदारजींचे आभार मानले. त्यांना मी दुकानात घेऊन गेलो कोल्ड्रिंक विचारलं पण त्यांनी फक्त पाणी मागितलं. आम्ही त्यांना बसायला टेबल दिलं आणि पाणी आणून दिलं. त्यांच्याशी बोलल्या नंतर समजलं की ते उल्हासनगर हुन आले होते. त्यांना पोलीस स्टेशनला महत्वाचं काम होतं. पण वासरूला बघून ते थांबले. त्यांनी आपला किमतीचा वेळ देऊन वासरूला वाचवलं होतं. हा एक माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस होता....

Sunder
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्त अनुभव सांगितलात !
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteछान अनुभव, नेहमीप्रमाणे छान वर्णन करून सांगितला.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete