टिळकनगर मधील फ्रेंड्स लायब्ररी मध्ये माझ्याकडची जागा खूप मोठी पण मी लायब्ररी साठी मात्र त्यातला अर्धा भागच वापरला. माझ्याकडे लायब्ररीमध्ये सहा लोखंडी रॅक होते. त्यातले दोन उजव्या बाजूला, दोन डाव्या बाजूला तर उरलेले दोन समोरच्या बाजूला लायब्ररीच्या मधोमध लावून मागे जागा तयार केली. सहाच्या सहा लोखंडी रॅक पुस्तकांनी भरलेली लायब्ररी छान दिसायची. एका बाजूला कॉलेजची पुस्तके, समोर आणि दुसऱ्या बाजूला मराठी कथा कादंबऱ्या, लेखकाप्रमाणे आणि काही विषयाप्रमाणे पुस्तके आम्ही लावले. त्यामुळे सभासदांना पुस्तक शोधायला सोपं पडायचं. आतल्या भागात "युथ असोसिएशन ऑफ डोंबिवली"च्या मीटिंग होत होत्या. जास्त करून रविवारी मीटिंग असायची. पावसाळ्यात झाडे लावणे, नागरिक समस्यांवर व्यंगचित्र स्पर्धा, पूरग्रस्तांना मदत, टिळकनगर मधले इमारतींचे नावाचे फलक असे बरेचसे उपक्रम आम्ही राबविले.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी डोंबिवलीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून अयोध्ये त घेऊन जाण्याकरिता रामशीलाच्या पूजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले. त्यात एका रामशीलचे पूजन आपल्या लायब्ररीमध्ये करण्यात आले. टिळकनगर मधल्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्रीमती तारा नाईक यांच्या हस्ते रामशिलाचे पूजन करण्यात आले. पूजनासाठी टिळकनगर मधील बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती, संघाचे काही लोकं, टिळकनगरातील सामान्य नागरिक आणि लायब्ररीचे वाचक उपस्थित होते. माझ्यासाठी ही एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती.
लायब्ररीचा मागचा भाग रिकामा होता त्या जागेचा काहीतरी चांगला उपयोग करायच अस मी ठरवलं. लायब्ररीत सभासद संख्या कमी असल्यामुळे पाहिजे तेवढं उत्पन्न होत नव्हतं. त्याकाळी बरेचसे वाचनालय चालवणारे लोक जोड व्यवसाय करत होते. उदारणार्थ ज्ञानविकास वाचनालयाचे परांजपे काकांनी परांजपे उद्योग नावाने कंपनी सुरू केली. लादी साफ करण्याचे सामग्री ते तयार करायचे. मी पण विचार केला काहीतरी जोड धंदा सुरू करायचा. माझे जिजाजी ताईचा नवरा डोंबिवलीत एम.आय.डी.सी. मध्ये एका कंपनीत काम करायचे. त्यांच्या कंपनीत प्लॅस्टिक सिलिंगचे मशीन तयार होत होते.जिजाजी मला म्हणायचे तू मशीन घे आणि प्लॅस्टिकचे फोल्डर वगैरे तयार करता येईल त्यात चांगला नफा आहे. तुझ्या जागेचा पूर्णपणे उपयोग होईल. मी विचार केला सुरू करायला काही हरकत नाही. तसेही जिजाजी घरचेच होते मशीनचे पैसे नंतर दिले तरी चालणार होतं. मी मशीन घ्यायचं ठरवलं आणि त्यांना ऑर्डर दिली.मला वाटत १९९१ साली एप्रिल महिन्यात मी मशीन घेतली.
मशीन कशी चालवायची त्याचे पार्टस कुठे मिळतात. त्याला लागणार प्लॅस्टिक कुठे मिळेल? वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅस्टिक वस्तू बनवण्यासाठी वेगळे डाय लागणार होते ते कोणाकडून बनवून घ्यायचे? असे बरेचसे प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले.पुढचं महत्वाचं म्हणजे ऑर्डर कशी?कुठून मिळवायची. कामत पेन साठी पाउच ची ऑर्डर मिळणार होती अजून फोल्डर बनवून एका पार्टीला द्यायचं होतं. हे सर्व छोट्या ऑर्डर्स होत्या मला मोठ्या प्रमाणात नियमित पणे ऑर्डर्स पाहिजे होत्या. मी विचार केला आधी आपण छोट्या कामा पासून सुरुवात करूया त्यातून शिकायला मिळेल समजा काही नुकसान झालं, एखादी ऑर्डर कॅन्सल झाली किंवा रिजेक्ट झाली तर जास्त नुकसान झालं नसत. आधी सर्व शिकून घ्यायचं ठरवलं. तसे जिजाजी मदतीला होतेच म्हणा. आपण काय काय तयार करु शकतो? याची यादी मी तयार केली. शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी आणि वव्ह्यांना लागणारे प्लॅस्टिक कव्हर, रेल्वे पास कव्हर,पेन ठेवण्या साठी प्लॅस्टिक फोल्डर, फोल्डर फाईल्स व इतर वस्तू बनविणे शक्य होते. तेव्हा पुस्तकांच्या प्लॅस्टिक कव्हर साठी खूप मागणी होती. थोडे दिवसात सर्व शाळा सुरू होणार होत्या. पुस्तकांच्या कव्हर पासून सुरुवात करण्याचं ठरवलं. समजा ऑर्डर कॅन्सल झाली तरी आपल्याच दुकानातून विकता आलं असतं. त्यासाठी लागणार प्लॅस्टिक मस्जिद बंदर ला मिळत होत. जिजाजींनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन प्लॅस्टिकची चौकशी केली सुरुवातीला फक्त एक प्लॅस्टिक रोल मी घेऊन आलो. एक रोल शंभर मीटरचा जवळपास आठ ते दहा किलो वजनाचा असायचा. तेव्हा एका किलो ला चाळीस रुपये इतकी किंमत होती. आता कव्हरच्या साईजची डाय बनवून घ्यायची होती. कंपनीकडून बनवून घेतलं तर खूप महाग मिळायची. जिजाजिंनी सायन पूर्वीकडे राहणारा एका डाय बनवणाऱ्याचा पत्ता दिला. मी त्यांच्या घरी गेलो. सायन पूर्वेकडे स्टेशन जवळच एका चाळीत त्यांच घर. मी सुमारे अकराच्या दरम्यान पोचलो असेन त्याच्या घरी त्यांचा मुलगा अजून अंथरूण पांगरून झोपलेला. ते लोकं सिंधी होते. ते उशिरा झोपायचे आणि उशिरा उठायचे. ते काका वयस्कर होते त्यांना मी डोंबिवलीहून आल्याचे सांगितले आणि दोन डाय बनविण्याची ऑर्डर दिली बरोबर पैसे देऊन आलो. त्यांनी चार दिवसांनी येऊन घेऊन जायला सांगितलं.
मे महिन्याच्या सुरुवातीला "फ्रेंड्स प्लॅस्टिकस" नावाने नवीन जोड व्यवसायाला मी सुरुवात केली. डोंबिवलीतल्या पुस्तकांच्या दुकानदारांना, शालेय सामग्री पुरवणारा माझा मित्र राजेश मोटा याला मी प्लॅस्टिक कव्हर बनविण्याचे मशीन घेतल्याचे सांगितले. त्याने मला तीन हजार छोटे व दोन हजार मोठे कव्हर्सची ऑर्डर दिली थोडे पैसे ऍडव्हान्स ही दिले. माझा जास्ती वेळ दुकानात जात असल्यामुळे मी जास्त वेळ देऊ शकत नव्हतो. टिळकनगर मधल्या रजत सोसायटीत राहणाऱ्या बबलू नावाच्या एका मित्राला कामाला ठेवल. मी रात्री दुकान बंद करून घरी जाऊन जेवून आल्यावर सुमारे साडे दहा ते बारा वाजेपर्यंत काम करायचो. जवळपास दहा दिवसांनी आम्ही दोघांनी मिळून पहिली ऑर्डर पूर्ण केली!!! मला सर्व मटेरियल इतर खर्च मिळून छोटे कव्हर्स साठ पैसे आणि मोठे कव्हर्स नव्वद पैसेला पडले. दहा पैसे एका कव्हरच्या मागे नफा ठेवून पाच हजार प्लॅस्टिक कव्हर्स राजेश मोटाला पाठवून दिले. फक्त दहा दिवस काम करून पाचशे रुपये कमवले!!! "फ्रेंड्स लायब्ररी" बरोबर "फ्रेंड्स प्लॅस्टिक" या नावाच्या नवीन व्यवसायाला मी सुरुवात केली.....

पै नविन कल्पना घेऊन व्यवसाय करणे हे कौतुकास्पद आहे. त्यात मेहनत भरपूर छान
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteतुमच्या धडपडीला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी समृद्ध असलेल्या जगण्याला मनापासून सलाम!!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteसर सध्या पण हा व्यवसाय सुरू आहे का?
ReplyDeleteनाही.
DeleteSir how do you feel today when you look back at those days.. you started all this when I was born.. even I share some nostalgia with Tilak Nagar, Dombivli East... Had my uncle's place there..
ReplyDeleteMakes me feel Proud & Joyful looking back remembering those days.
DeleteVery Enterprising. Terrific Spirit !!
ReplyDelete