माझी चार मुलांची गँग होती. मी मिळून आम्ही पाच. अच्युत, खाजा, रवी, चौथ्याच नाव नीट आठवत नाही.
पहिला अच्युत नायक, घराच्या बाजूला आमचे नातेवाईक पुरुषोत्तम पै, यांच्या मुलीचा मुलगा. त्याचे वडील वारल्यामुळे ते आजोबांकडे राहायचे, ते जाम कडक होते आम्ही घाबरायचो त्यांना. त्यांचा मुलगा वेंकटेश— अच्युतचे मामा, त्यांचं हॉटेल होतं 'कोर्ट रेस्टॉरंट' ते कोर्टाच्याजवळ होतं कोर्टामधे येणारे जाणारे सर्व त्यांचे गिऱ्हाईक होते त्यामुळे ते श्रीमंत होते. आमच्याकडे सकाळी पेज असायची ते पण उकडा तांदळाची, कधी कधी सकाळच्या नाश्त्याला मी त्यांच्याकडे जायचो.
दुसरा मित्र खाजा. हा माझा खास मित्र. त्याचं घर आणि माझ्या घराच्यामधे एक घर होतं. ते पण मुस्लिम होते. खाजाच्या वडिलांची पानाची गादी होती. आम्ही त्याला बीडा अंगडी म्हणायचो. अंगडी म्हणजे दुकान. तिकडून आम्ही काही समान आणायचो. त्यांच्याकडे पान, सुपारी, चिक्की, केळं, माचीस गूळ वगैरे. तेव्हा आमच्याकडे वेगळा गूळ मिळायचा आतासारखा नाही. सुकलेल्या केळीच्या पानांचे लांब तुकडे करून खाली आणि वर दोरीने बांधून त्याला गोल आकार द्यायचे आणि त्यात चपटे गोलाकाराचे वीस गुळाचे तुकडे असायचे. ते एक दोन तुकडे विकायचे. आम्ही गूळ खीरसाठी आणि कॉफीसाठी वापरायचो त्याचा रंग काळा असायचा. आम्ही राहायचो त्या रस्त्याचं नाव मधूगुड्डे रोड आणि पुढे एक किलोमीटरवर समुद्र असल्या कारणामुळे मच्छी पकडणारे आणि शेती काम करणारे आमच्या घरासमोरून जायचे. ते पाणी मागायचे, आमची आई एक तांब्यात पाणी आणि त्या गुळाचा तुकडा घ्यायची. ती म्हणायची उन्हात फिरून तहान लागलेल्यांना पाण्याबरोबर काही तरी गोड द्यायला हवं, आम्ही गूळ घ्यायचो. जो खाजाच्या वडिलांच्या दुकानात मिळायचा.
तिसरा रवी. ह्याचा खोबरेल तेल काढायचा चरखा म्हणजे घाणा होता. कोणी खोबरं आणून दिलं की ते त्या घाण्यामध्ये टाकायचे त्याला चाकं होती, त्याला गाय बांधलेली असायची ती गाय पुढे गेली की ते चक्र फिरायचं मग खोबरेल तेल यायचं ते बघायला खूप गम्मत वाटायची. तेल काढल्यानंतर ते सुकं खोबरं चिक्कीसारखं बनायचं ते आम्हाला खायला मिळायचं.
चौथ्याचं नाव मी विसरलो. त्याचे वडील सुताराचे काम करायचे आणि नवरात्रीला आमच्या कुंदापूरमध्ये एक स्पर्धा असायची नऊ दिवस वेगवेगळ्या वेशभूषेत काही लोक घराघरांमधे हिंडायचे. चांगली वेशभूषा आणि अभिनयाला बक्षीस मिळायचं. श्रीराम, श्री शंकर, नारदमुनी,श्री हनुमान असे वेगवेगळ्या पोशाखात लोकं यायचे. माझ्या मित्राच्या वडिलांनी नारदाचा वेश घातलेला. त्यांना तिसरं बक्षीस मिळालं होतं. या सर्वांत मीच मोठा होतो वयाने पण आणि उंचीला पण. मी जेव्हा बाहेर पडायचो तेव्हा हे चारही मित्र माझ्याबरोबर असायचे. मला एकट्याला झाडावर चढता येत होतं. मी त्यांना कैरी, चिकू, पेरू तोडून द्यायचो. आमच्या सर्वांच्या हातात काठी असायची माझी काठी मोठी असायची. जर कोणी मोठी काठी आणली की मी तोडायचो.. माझी दादागिरी.. ते छोटे बिचारे.. गुपचूप माझ्यामागे असायचे.
माज्या शाळेचं नाव गर्ल स्कूल,शाळेचं नावं गर्ल स्कूल असलं मुली आणि मुले दोन्ही शिकायचे या शाळेत. आमच्याकडे दोन वेळेची शाळा होती सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी एक ते चार. दुपारी बाराला शाळा सुटायची शाळा जवळ असल्यामुळे दुपारी जेवायला घरी. जेवून परत शाळेत. सकाळी आठ चाळीस पर्यंत घरून निघायचो. शाळा खूप जवळ होती. आमचा मधूगुड्डे रोड ओलांडला की देवळाचा मागचा रस्ता, तिकडून एक जवळचा रस्ता होता. ती छोटीसी वाट होती. दोन्ही बाजूला घरं, दोन्ही घराचे कुंपण झाडांनी आणि मातीने बांधलेलं होतं. खाली वाळू अामच्याकडची वाळू पांढरी शुभ्र. कुठेही कचरा नाही, पाणी नाही, स्वच्छ. मोठमोठी झाडं. एक चिंचेच झाड होत मी दगड मारायचो चिंच पडलं की सर्वाना खायला मिळायची.
मी पाचवीत होतो त्यावेळेस एकेदिवशी नेहमी प्रमाणे आम्ही दुपारी जेवण उरकून शाळेला निघालो देवळाच्या मागच्या गल्लीत पोचलो. कोपऱ्यावर एक इलेक्ट्रीकचा खांब होता. त्याच्यावर एक माणूस ब्रशने सिल्व्हर कलर मारत होता त्याचे कपडे फाटले होते डोक्याला रुमाल बांधला होता. चेहऱ्यावर आणि अंगावर सिल्व्हर कलर लागलेला होता तरी तो आपलं काम करत होता. आम्ही त्या खांबाजवळ गेलो आणि मी त्याला बघून हसलो तसे सर्व मित्र हसायला लागले. आम्ही त्याला त्याच्या कपड्यांवरून आणि चेहऱ्याच्या रंगावरून चिडवायला लागलो. त्यानी खाली बघितलं. मी परत त्याला चिडवायला लागलो. तुझा चेहरा बघ, तुझा ड्रेस बघ, वगैरे. मला वाटलं तो खाली येऊ शकत नाही. उंचीवर होता तो, आणि मी पळ काढण्यात पटाईत होतो. तरीपण तो खाली उतरला आणि मला पकडलं. माझ्यामुळे बाकीचे पण अडकले. माझ्याकडे अजून एक मोठं अस्त्र होतं.. ते म्हणजे ढसा ढसा रडायचं.. त्यानी सोडलं की पळून जायचं. आम्हाला वाटलं की तो मारेल आणि ओरडेल, आम्ही इतकं चिडवल्यानंतर तो आम्हाला सोडणार नाही. त्यांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी त्याच्या पॅन्टच्या खिशातून पाच जरीच्या पेपरमध्ये बांधलेली चॉकलेटं दिली. आम्ही त्याला कचपाचो म्हणायचो. पांढऱ्या रंगाचं चवीला पेपरमिंट सारखं असतं ते दिलं आणि त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. सर्वांच नाव विचारलं, कितवीत शिकता? वगैरे. आम्ही आमचं नाव सांगितले, कितवीत शिकतो ते पण सांगितलं. त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. तो बोलला माझे आई वडील गरीब होते. त्यामुळे मला शिक्षण नाही मिळालं. शिक्षण नसल्याने आणि गरीबीमुळे मला हे काम करायला लागतंय पण मी माझं काम आवडीने करतोय ह्या कामामुळेच माझं घर चालतं. माझी पण तुमच्या एवढी मुलं आहेत. ते शाळेत जातात या कामामुळेच. कुठलं ही काम कमी पणाचं नसतं. तुम्ही लहान आहात शाळेत जाऊन शिकून मोठं व्हायचं. चांगली नोकरी करायची. म्हणजे माझ्यासारखी परिस्थिती निर्माण नाही होणार. मग त्यांनी माझा हात सोडला. मी लक्ष देऊन ऐकत होतो. मला काहीच समजलं नव्हतं. त्यांनी माझा हात सोडला. लगेच सर्व मित्रांना घेऊन पळत सुटलो. मग बरेच दिवस त्या वाटेवरुन जायचं बंद केलं. आजही तो माणूस माझ्या डोळ्यासमोर येतो. त्याचे ते कपडे त्याच्या चेहरा, हा माणूस मला बरेच काही शिकवून गेला. आतापर्यंत बऱ्याच लोकांना ही गोष्ट मी सांगितली आहे.

Very nice.Keep it up.
ReplyDeleteThank you.
Deleteपै सर, छान लिहिताय् तुम्ही! डोळ्यासमोर सर्व चित्र उभे रहाते!
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteखूप छान बारकाव्यांसकट लिहीतायं! वाचताना दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं.
ReplyDeleteधन्यवाद, आपल्या कडूनच प्रेरणा घेतली...
Delete